आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Adjourns For The Day After Obituary References

जातीय हिंसाविरोधी विधेयकावर संसदेबाहेर चर्चा, अधिवेशनाचे आजचे कामकाज स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (गुरुवार) सुरुवात झाली आहे. मात्र, संसदेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करुन दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. मात्र, जातिय हिंसांचार विरोधी विधेयकावर संसदेबाहेर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

जातिय हिंसाविरोधी विधेयकाला विरोध
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज जातीय हिंसाविरोधी विधेयकाला विरोध करणारे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी या संदर्भात पंतप्रधानांना पत्र देखील लिहिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) ट्विट केले आहे, की जातिय हिंसाविरोधी विधेयक कच्चे आहे. त्यात सुधारणेची गरज असल्याचे पत्र मी पंतप्रधानांना लिहिले आहे.
मोदींनी पुढे लिहिले आहे, की या सारखे विधेयक मांडण्यापूर्वी त्यावर राज्य आणि विविध स्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे.
विधेयक राजकीय विचारांनी प्रेरीत आणि एकगठ्ठा मते डोळ्यासमोर ठेवून आणल्याचे म्हणत मोदींनी विधेयकाची वेळही संशायस्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच हे विधेयक संघराज्याच्या रचनेचे उल्लंघन करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.