आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Attack News In Marathi, National News

याच दिवशी झाला होता संसदेवर दहशतवादी हल्ला, बघा Exclusive Pics

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 13 डिसेंबर 2001 रोजी भारतातील लोकशाहीचे मंदिर अशी ओळख असलेल्या संसदेवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला आज (शुक्रवार) 12 वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याचा सुत्रधार अफझल गुरू याला फासावर चढविण्यात आले असले तरी पडद्यामागचे सुत्रधार अद्याप फरारी आहेत.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-महंमदच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला. यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह सुमारे 200 खासदार संसदेत उपस्थित होते. दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समजल्यानंतर अडवाणी, फर्नांडिस यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांना संसदेतील सुरक्षित स्थळी नेण्यात आले होते. संसदेची सर्व दारे आतून बंद करण्यात आली होती. त्यामुळे दहशतवाद्यांना आत प्रवेश करता आला नाही. नाहीतर अनर्थ घडला असता. केंद्रीय मंत्र्यांसह संपूर्ण सभागृहाला ओलीस धरून हव्या त्या मागण्या मान्य करून घेण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता.
संसदेवर हल्ला झाल्याचे समजल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संसदेला घेराव घातला. कमांडोंनी एक एक दहशतवादी टिपला. त्यानंतर संसदेची दहशतवाद्यांच्या तावडीतून यशस्वीरीत्या सुटका झाली. या कारवाईत आठ सुरक्षा रक्षक शहिद झाले.
काही दिवसांनी या हल्ल्याचा सुत्रधार अफझल गुरू याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोषी घोषित केले. त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु, त्याला फाशी दिल्यावर जम्मू-काश्मिरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उठण्याची शक्यता असल्याने त्याला फाशीवर लटकविण्यात आले नाही. परंतु, कालांतराने केंद्र सरकारने फाशीची अंमलबजावणी केली. तिहार तरुंगात त्याला फासावर लटकविण्यात आले.
या हल्ल्यानंतर आता संसदेची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संसदेच्या आवारात असलेल्या सुरक्षा रक्षकांना शस्त्रे हाताळण्याची परवानगी देण्यात आली आहे. असा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाईड्सवर बघा संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे LIVE Pics...