आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कारासाठी ज्योतिरादित्य सिंधियांनी मागितली दोन दिवसांची सुटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलामांना श्रद्धांजली अर्पण करताना खासदार. - Divya Marathi
कलामांना श्रद्धांजली अर्पण करताना खासदार.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम एकदा म्हणाले होते, माझ्या मृत्यूनंतर कोणत्याही शाळा, कॉलेज किंवा ऑफिसेसना सुटी देऊ नका. मला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर एक दिवस जास्त काम करा. बहुतांश राज्यामधील सरकारने त्यांच्या या इच्छांचा आदर करत शाळा, कॉलेजेसना सुटी देणे टाळले. मात्र, त्याचवेळी काँग्रेस खासदार ज्‍योतिरादित्‍य सिंधिया यांच्या मागणीवर लोकसभेला आणि त्याचआधारे राज्यसभेलाही दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली.

नंतर वाढवली सुटी
मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेत कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ एका दिवसासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवण्याची घोषणा झाली. राज्यसभेत सर्व पक्षांनी ते मान्य केले. पण लोकसभेत काँग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नियमांचा हवाला देत दोन दिवसांच्या सुटीची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जनरल पर्पज रूल्सनुसार जर माजी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा अंत्यसंस्कार दिल्लीत होणार असेल तर संसदेला एका दिवसाची सुटी असेल आणि दिल्लीच्या बाहेर अंत्यसंस्कार असल्याच दोन दिवसांची सुटी असेल. सिंधिया यांच्या मते, बहुतांश नेते अंत्य संस्कारामध्ये सहभागी होण्यासाठी जातील. कलाम यांच्या पार्थिवावर रामेश्वरम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. इतर पक्षांच्या सदस्यांनीही याला दुजोरा दिला, तेव्हा सभापती सुमित्रा महाजन यांनी दोन दिवसांच्या सुटीची घोषणा केली.

...नंतर राज्‍यसभेतही दोन दिवसांच्या सुटीची घोषणा
राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनीही लगेचच सर्वपक्षीय बैठक घेत त्यांची मते जाणून घेतली. सगळेच दोन दिवसांच्या सुटीशी सहमत होते. त्यामुळे राज्यसभेलाही दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली.

गुरुवारी कलामांना श्रद्धांजली
संसदेच्या दोन्ही सभागृहांची पुढची बैठक गुरुवारी होणार आहे. त्यातील सर्वात पहिला अजेंडा डॉ. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा असेल. यावेळी खासदारांना कलामांबाबत बोलण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरच संसदेचे कामकाज सुरू होईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS