आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण यांच्याकडे अपिलासाठी 60 दिवस; वाचा, पाक मीडियाने नवाझ शरीफ यांना काय दिला सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- निरपराध भारतीय कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी लोकसभेत हा इशारा देताना म्हणाल्या, ‘जाधव यांना न्याय देण्यासाठी हवे तर वेगळा मार्ग पत्करू, मात्र मागे हटणार नाही. जाधव यांना फाशी दिल्यास पाकिस्तानला द्विपक्षीय संबंधात गंभीर परिणाम भोगावे लागतील.’ 

दरम्यान, या इशाऱ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लगेच प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी लष्कर कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सज्ज असल्याचे ते म्हणाले. वर पाक शांतताप्रिय देश असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान, पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, जाधव यांना अपील करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी आहे. जाधव यांच्याविरुद्ध बेकायदेशीर काहीही झालेले नाही. ही फाशी म्हणजे ठरवून केलेली हत्याच मानली जाईल, हा भारताचा दावा त्यांनी फेटाळला. जाधव यांच्याविरुद्ध तीन महिने सुनावणी सुरू होती, असे ते म्हणाले.

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, पाकिस्तानची कृती केवळ भारतावरील हल्ल्यासारखी नाही तर आंतरराष्ट्रीय कायदा व करारांवरही हल्ला आहे. 

पाकिस्तानी मीडियाचा नवाज यांना सल्ला: परिणामांना तोंड देण्यास तयार राहा
- या निर्णयामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढेल. पाक कायद्यानुसार लष्कराने कडक शिक्षा दिली आहे. मात्र, पाकिस्तान याचे राजकीय दुष्परिणाम सहन करू शकतो की नाही हे आपणास पाहावे लागेल.- द नेशन
- भारत- पाकमध्ये आधीपासूनच तणाव आहे. आम्हाला अस्थिर करण्यात भारताचा हात आहे हे सांगण्याचा पाकचा प्रयत्न आहे. आता भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यासाठी तयार असले पाहिजे.- डॉन
- सर्वात आधी पाकिस्तानने हेराविरुद्धचे पुरावे सार्वजनिक करावेत. आंतराष्ट्रीय स्तरावर ही माहिती द्यावी. भारताने प्रतिक्रिया द्यायला नको. अजमल कसाबच्या फाशीवर पाकिस्तान पूर्णपणे शांत होता.- हामिद मीर, जियो
- लष्कर ज्युरी कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित नव्हते. ते पाक लष्कराच्या कमांडंटमध्ये काम करतात. हे आंतरराष्ट्रीय परिषदेच्या नागरी आणि राजकीय हक्काच्या विरुद्ध आहे.
- नवदीप सिंह, लष्करी प्रकरणांचे वकील
 
मोदी सरकारच्या काळात संसदेत प्रथमच राजकीय पक्षांत एकी
नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवरून मोदी सरकारच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रथमच राजकीय पक्षांत एकी दिसून आली. सर्जिकल स्ट्राइकवरही टीका करणाऱ्या विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर एकमुखाने पाकचा निषेध केला. लोकसभेत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खड‌्गे म्हणाले, ‘जाधवना वाचवले नाही तर तो केंद्राचा कमकुवतपणा ठरेल.’ राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, भारताची बदनामी करण्यासाठी पाकने हे षड‌्यंत्र रचले आहे. सुषमा स्वराज व राजनाथसिंह म्हणाले, दहशतवादावरून एकट्या पडलेल्या पाकमधील हे प्रकरण म्हणजे भारताविरुद्धचा डाव आहे. 

संशय : जाधव यांच्या हत्येवर पांघरूण टाकण्यासाठी नाटक
पाकच्या लष्करी कोर्टात बंद खोलीत चाललेल्या या खटल्यात जाधव यांना फाशी सुनावण्यात आल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. भाजप खासदार आर. के. सिंह म्हणाले, ‘असा गुप्त खटला चाललाच नाही. जाधव यांचा छळ करून हत्या करण्यात आली आहे. अन्यथा पाकने जाधव यांची भेट घेण्याची भारतीय वकिलातीला परवानगी दिली असती.’ लष्करी अधिकारी मेजर जन. गगनदीप बक्षी यांनी ही हत्या लपवण्यासाठी पाकचे हे नाटक असल्याचे सांगितले. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... काय म्हणाले ओवेसी...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...