आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Live: Mulayam Attacks Modi Government, Divya Marathi

देशाची ओळख \'स्‍कॅम इंडिया\' ऐवजी \'स्किल इंडिया\' अशी व्हावी- नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - भारताची ओळख जगामध्‍ये 'स्‍कॅम इंडिया' अशी झाली आहे. तिचे रुपांतर 'स्किल इंडिया' मध्‍ये करावयाचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या भाषणामध्‍ये सांगितले. ते लोकसभेमध्‍ये बोलत होते.
पंतप्रधान मोदी आपल्‍या भाषणाच्‍या सुरुवातीला म्‍हणाले की, जर माझ्याकडून काही चूक झाली तर कृपया माफ करा. त्‍यानंतर मोदींनी लोकसभेमध्‍ये विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नांचे उत्‍तरे देण्‍यास सुरुवात केली.
मोदी यांच्‍या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- विकासाचे जनआंदोलन उभे करावे लागणार आहे.
- दलित आदिवासी यांच्‍यासाठी भरीव योगदानाची गरज
- ज्‍या प्रमाण्‍ो महात्‍मा गांधी यांनी प्रत्‍येक कार्येक्षेत्रामध्‍ये देश स्‍वांतत्र्याची बीज पेरणी केली होती. त्‍याच सिध्‍दांताचा वापर आपल्‍याला विकासाच्या जनआंदोलनात करावा लागणार आहे. आपल्‍याला असे आंदोलन उभे करावे लागणार आहे की, देशातील प्रत्‍येक नागरिकास स्‍वत: देशाच्‍या विकासाचे एक भाग आहोत असे वाटायला हवे.
महिला संरक्षण मुद्यावर
- महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणे गरजेचे आहे.
- मागील काही काळामध्ये घडलेल्या घटना मन विचलित करणाऱ्या आहेत
- महिलांच्या रक्षणाची सव्वाशे कोटी लोकांची जबाबदारी आहे.
- बलात्कार थांबवण्यासाठी मोठे निर्णय घेणे आवश्यक आहे, देश आता जास्त काळ वाट पाहू शकत नाही.
खेड्यांचा विकास करणार
- छोट्या गावांमधील अर्थव्यवस्था मजबूत करणार
- शेतक-यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे शिक्षण देणार
- मातीसाठी हेल्थ कार्ड बनवले जाणार, वेळोवेळी मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जाईल.
-कृषी उत्‍पादनाला प्रोत्साहन दिले जाईल.
- कुटुंबाचा विस्तार वाढत आहे आणि जमीन कमी होत चालली आहे, यामुळे शेती करण्यासाठी आधुनिक पद्धतीची मदत घेतली जाईल.
- आमच्या सरकारचा एकच उद्देश असेल, की कोणताही गरीब उपाशी झोपणार नाही.
- कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनाला महत्त्व दिले जाईल.
कौशल्‍य विकासावर भर
- सीमालगतचा चीन म्हातारा होत असताना भारत तरुण होत आहे.
- आता भारताची ओळख 'स्‍कॅम इंडिया' ऐवजी 'स्किल इंडिया' अशी होणार आहे.
- देशामधील तरुण आमची शक्‍ती असून कौशल्‍य विकासावर आमचा भर असणार आहे.
- जीवन जगण्‍यासाठी हातामध्‍ये कौशल्‍य असायला हवे, पदवी असून चालत नाही.
-आपल्‍याला कौशल्‍य विकासावर अधिक भर द्यावा लागेल.
-भारतामधील शिक्षक जगभरामध्‍ये पाठवण्‍याची गरज आहे. एक व्‍यापारी विदेशात गेल्‍यास डॉलर आणतो तर एक शिक्षक विदेशात गेल्‍यास संपूर्ण पीढी घेवून येतो.
गरीबांचे सरकार
- जनतेच्‍या इच्‍छा, आकांक्षा पूर्ण करण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल.
-जनतेने स्थिर सरकारला निवडले आहे.
-शासनाचे पहिले कर्तव्‍य आहे की, त्‍यांनी जनतेचे ऐकावे आणि जनतेसाठी जगावे.
- समाजातील तळागाळातील प्रत्‍येक नागरिकांपर्यंत पोहोचण्‍याचे शासनाचे पहिले कर्तव्‍य असेल.
- गरीबीसोबत लढण्‍यासाठी सर्वांत महत्‍वाचे हत्‍यार म्‍हणजे शिक्षण होय.
पुढील स्‍लाइडवर वाचा - मुलायम यांनी साधला सरकारवर निशाणा तर सुषमाने केला बचाव