आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात 285 राष्ट्रीय संरक्षित स्मारके, श्रीपाद नाईक यांची लोकसभेत माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रात एकूण 285 संरक्षित राष्ट्रीय स्मारके असून 2011 ते 2014 या काळात औरंगाबाद विभागातील राष्ट्रीय स्मारकांच्या देखभालीकरिता 12 कोटी 97 लाख 7 हजार रुपये आणि मुंबई विभागातील स्मारकांच्या देखभालीकरिता 11 कोटी 88 लाख 99 हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती संस्कृती आणि पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत दिली.

देशभरातील राष्ट्रीय संरक्षित स्मारकांची एकूण संख्या 3 हजार 679 असून सर्वाधिक म्हणजे 743 राष्ट्रीय स्मारके उत्तर प्रदेशात आहेत. कर्नाटकात 507 राष्ट्रीय स्मारके असून तामिळनाडूमध्ये 413 राष्ट्रीय स्मारके आहेत. देशभरातील राष्ट्रीय स्मारकांच्या देखभालीसाठी 2011-12 या वर्षी 133 कोटी 89 लाख 88 हजार रुपये, 2012-13 मध्ये 148 कोटी 61 लाख 02 हजार रुपये आणि 2013-14 मध्ये 169 कोटी 36 लाख 16 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

देशातील राष्ट्रीय संरक्षित स्मारकांची राज्यवार आकडेवारी आणि त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्च किती? याकडे बारामतीच्या खासदार खा. सुप्रिया सुळे यांनी याकडे लक्ष वेधले होते. दिल्लीतील बेगमपुरी मशीदीविषयी विरासत उपनियम अहवाल तयार करण्यात आला असून तो राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणापुढे ठेवण्यात आला आहे. देशातील प्राचीन स्मारके तसेच पुरातत्व स्थळांसाठी संरक्षित स्मारके आणि संरक्षित क्षेत्रासंबंधी विरासत उपनियम तयार करण्यात येणार असल्याचेही श्रीपाद नाईक यांनी सांगितले.