आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी पोलिसांचे ऐकलेच नाही; गुजरातमध्ये हल्ल्याच्या घटनेनंतर संसदेत बोलले गृहमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्या दिवशी राहुल गांधींनी पोलिसांचे ऐकले नाही - सरकार - Divya Marathi
त्या दिवशी राहुल गांधींनी पोलिसांचे ऐकले नाही - सरकार
नवी दिल्ली - संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी मोठा गदारोळ झाला. लोकसभेत विरोधी पक्षाने गुजरातच्या बनासकांठा येथे राहुल गांधींच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा मांडला. त्यावर सरकारने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या दिवशी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पोलिस किंवा एसपीजीचे काही एक ऐकले नाही. ते केवळ आपल्या खासगी सचिवांचे ऐकत होते. तर दुसरीकडे, राज्यसभेत विरोधकांनी नोटांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सरकार दोन प्रकारच्या नोटा छापत असल्याचे गंभीर आरोप लावले आहेत. 
 
 
राहुल गांधींवरच लावले आरोप
- गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "दगडफेकीची घटना घडल्यानंतर परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधींना देखील पोलिस संरक्षण देण्यात आले. काही पोलिस त्यांच्या वाहनात सुद्धा बसले होते."
- ''गेल्या 2 वर्षांत राहुल गांधींनी 6 परदेश दौरे करून 72 दिवस बाहेर घालवले. मात्र, त्यांनी एसपीजी सुरक्षा घेतली नाही. ते कुठे गेले होते आणि त्यांनी एसपीजी संरक्षण का घेतले नाही? हा केवळ एसपीजी कायद्याचेच नाही, तर संरक्षणाच्या उल्लंघन आणि निष्काळजीपणाचे प्रकरण आहे.'' 
- ''राहुल कुठेही जात असले तरी ते पोलिस किंवा एसपीजीचे ऐकत नाही. ते केवळ आपल्या खासगी सचिवांचे ऐकतात.''
- "गुजरात सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. या संदर्भात एका व्यक्तीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. तरीही, राहुल गांधी यांनी सुरक्षेचे नियम पाळायला हवे."
बातम्या आणखी आहेत...