आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धर्म सोडा अन्यथा कठोर कारवाई होईल\' चीनच्या सत्ताधारी पक्षाचे 9 कोटी सदस्यांना आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कम्युनिस्ट पक्षाच्या 9 कोटी सदस्यांनी धार्मिक कर्मकांडांपासून दूर राहावे असे आदेश आहेत. - Divya Marathi
कम्युनिस्ट पक्षाच्या 9 कोटी सदस्यांनी धार्मिक कर्मकांडांपासून दूर राहावे असे आदेश आहेत.
बीजिंग - चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या 9 कोटींहून अधिक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना धर्म सोडण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे, तर धार्मिक रुढी परमपरांचे पालन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या मासिकेच्या नव्या अंकात हे आदेश दिले आहेत. चीनच्या राज्यघटनेत धार्मिक स्वातंत्र्य असले तरीही कम्युनिस्ट पार्टी एक नास्तिक पक्ष आहे. 

- कम्युनिस्ट पक्षाच्या धार्मिक व्यवहार प्रशासनाचे संचालक वांग झुआन यांनी मासिकामध्ये लेख लिहून आपल्या पक्षाच्या 9 कोटींहून अधिक सदस्यांना धर्म सोडण्याचे आदेश दिले आहेत. 
- वांग यांच्या आदेशावर सत्ताधारी पक्षाचे सुद्धा दुमत नाही. कम्युनिस्ट पक्षाने कधीही उघडपणे कुठल्याही धर्माचे समर्थन किंवा स्वातंत्र्यावर भाष्य केले नाही. तसेच आपल्या सर्वच सदस्यांना वेळोवेळी धार्मिक कर्मकांडांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
- पक्षाने यापूर्वीही धार्मिक रुढी परमपरांचे पालन करणाऱ्या सदस्यांच्या निलंबनाची शिफारस केली आहे. मात्र, थेट सर्वांना कारवाईचा जाहीर इशारा देण्याचे प्रकार क्वचितच घडले आहेत. 
- पक्षाच्या सदस्यांनी मार्क्सवादी निधर्मी विचारसरणीचे काटेकोरपणे पालन करावे. त्यांनी आपल्या पक्षाच्या नियमांच्या आधीन राहूनच काम करायला हवे. त्यांना कुठल्याही धर्माचे कर्मकांड करणे किंवा परमपरेचे पालन करण्याची परवानगी नाही असे वांग यांनी स्पष्ट केले.