आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेचे सत्र 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विद्यमान लोकसभेचे अंतिम सत्र पाच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ते 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यात लेखानुदान मागण्यांसह (अंतरिम बजेट) अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मांडली जाणार आहेत. आगामी अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅँटनी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची बैठक झाली. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी अधिवेशनाबाबत माहिती दिली. पाच फेब्रुवारीपासून सुरू होणारे हे सत्र हिवाळी अधिवेशनाचाच एक भाग असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सत्रात 17 फेब्रुवारीला लेखानुदान सादर केले जाण्याची शक्यता आहे.
ही विधेयके सादर होणार
भ्रष्टाचारविरोधी लढ्याला आणखी धार येण्याच्या उद्देशाने या अधिवेशनात काही विधेयके सादर करण्याचा सरकाराचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने या सत्रात पुढील विधेयके सादर केली जातील.
ही विधेयके मांडणार
* व्हिसिलब्लोअर संरक्षण विधेयक
* न्यायिक उत्तरदायित्व विधेयक
* भ्रष्टाचार रोखणारे दुरुस्ती विधेयक
* सिटिझन चार्टर विधेयक
* विदेशी अधिका-यांचा भ्रष्टाचार रोखणारे विधेयक
* सार्वजनिक खरेदी विधेयक