आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसद अधिवेशन अचानक गुंडाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा गोंधळात गेला. सरकारने बुधवारी अचानक संसदेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित केले. अधिवेशन आणखी दोन दिवस चालणार होते. यामुळे अनेक महत्त्वपूर्ण विधेयके लटकली आहेत. अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 22 एप्रिल रोजी सुरू झाला होता. लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी अधिवेशन समाप्तीबाबतचे औपचारिक भाषणही केले नाही. ज्यांचा कार्यकाळ लवकर पूर्ण होणार आहे, अशा खासदारांना राज्यसभेमध्ये निरोप देण्यात आला.


या मुद्द्यांवर गोंधळ
कोळसा घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम, रेल्वे लाचखोरी, सीबीआयच्या कामात सरकारी हस्तक्षेप आदी.
दोन विधेयक मंजूर होऊ शकले नाहीत
राष्‍ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक आणि भूसंपादन विधेयक


विरोधी पक्षाची मुख्य मागणी
पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा. कायदा व रेल्वेमंत्र्यांना बडतर्फ करावे. टूजी स्पेक्ट्रम प्रकरणी संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष बदलावेत.
झालेले कामकाज
गोंधळामध्ये चर्चेविना सर्वसाधारण अर्थसंकल्प, रेल्वे अर्थसंकल्प, विनियोग विधेयक, विविध मंत्रालये आणि विभागांच्या निधीला मंजुरी. पाकिस्तानच्या नॅशनल असेब्लिने संसद हल्ला प्रकरणातील दोषी अफजल गुरूला फाशी दिल्याबद्दल निंदाव्यंजक ठराव मंजूर केला. त्यावर पाकिस्तानने भारतीय प्रकरणात नाक खुपसू नये, अशी सर्व खासदारांची एका सुरात भावना व्यक्त.


विरोधकांना भ्रष्टाचाराचा नवा मुद्दा
रेल्वे बोर्डामध्ये लाच देऊन बढती मिळवण्याचे प्रकरण. यामध्ये रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांचा भाचा विजय सिंगला तसेच रेल्वे बोर्डाचे सदस्य महेश कुमार व अन्य काही जणांना अटक झाली आहे.