आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपा खासदारांनी केली वेतनवाढीची मागणी; जाणून घ्या PM मोदींसह खासदारांचे सध्याचे वेतन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी बुधवारी राज्यसभेत खासदारांच्या वेतनवाढीची मागणी केली. सध्या खासदारांना मिळणारे वेतन हे सचिवांपेक्षा कमी आहे असे अग्रवाल म्हणाले. त्यांच्या मागणीला काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनीही पाठिंबा दिला. जगात खासदारांचा एवढा अपमान कुठेही होत नाही अशा शब्दात शर्मा यांनी वेतनवाढीच्या मागणीचे समर्थन केले. त्यामुळे, सध्या खासदारांना वेतन किती आहे आणि त्यांना किती वाढ हवी हे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून जाणून घेऊ...
 
 
Q. सध्या खासदारांचे वेतन किती?
A. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना दरमहा जवळपास 1.40 लाख रुपये दिले जातात. यात विविध प्रकारच्या भत्त्यांचा देखील समावेश आहे. 

Q. संसदीय समितीच्या शिफारशी कोणत्या?
A. संसदीय समितीच्या मते, खासदारांचे वेतन हे महागाईनुसार वाढायला हवे. त्यानुसार, संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते 1.40 लाखांवरून 2.80 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. 
 
Q. यापूर्वी कधी झाली वाढ?
A. 2010 मध्ये वेतन-भत्त्यांचे रिव्यू करण्यात आले होते. तसेच 300% वाढ देण्यात आली होती. 
 
Q. माजी खासदारांच्या निवृत्ती वेतनाचे काय?
A. माजी खासदारांचे मासिक निवृत्ती वेतन 20 हजार रुपयांवरून 35 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. 
 
Q. आतापर्यंत कितीवेळा वाढले वेतन आणि भत्ते?
A. 1954 ते आतापर्यंत 35 वेळा खासदारांच्या वेतनाचा फेरविचार करण्यात आला. 1954 ते 2000 पर्यंत मूळ वेतनात 167% आणि 2000 ते 2010 पर्यंत यात 1150% टक्के वाढ करण्यात आली आहे. 
 
Q. कोणत्या राज्यात आमदारांना नुकतीच वेतनवाढ?
A. तामिळनाडू सरकारने 19 जुलै रोजी आमदारांचे मासिक वेतन 55 हजार रुपयांवरून 1.05 लाख रुपये केले आहे. तसेच मतदार संघ निधी सुद्धा 2 कोटींवरून 2.5 कोटी करण्यात आला आहे. 

पुढे... पीएम मोदी, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे वेतन किती..? 
बातम्या आणखी आहेत...