आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliamentary Committee Recommended Payment Hike To MP

खासदारांचे वेतन करा दुप्पट, निवृत्तिवेतनही वाढवा; संसदीय समितीची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - वाढत्या महागाईत सामान्य माणसाचे काय होईल ते होवो, परंतु केंद्र सरकारने खासदारांना मात्र दिलासा देण्याचे ठरवले आहे. संसदेच्या संयुक्त समितीने खासदारांचे वेतन १०० टक्के वाढवण्याची शिफारस केली असून निवृत्तिवेतनातही भरघोस म्हणजे ७५ टक्के वाढ करण्याची शिफारस यात आहे.

सध्या खासदारांना ५० हजार वेतन मिळते. संसदेचे अधिवेशन सुरू असताना २ हजार रुपये रोज याप्रमाणे भत्ताही मिळतो. याशिवाय राहण्या-खाण्याच्या सुविधा वेगळ्या. भाजपचे खासदार आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीला हे वेतन आणि भत्ता कमी असल्याचे जाणवल्याने समितीने ही शिफारस केली आहे. यापूर्वी २०१० मध्ये खासदारांचे वेतन वाढवण्यात आले होते. आता पे-रिव्हिजन पद्धतीने ते वाढवले जावे, असे समितीचे म्हणणे आहे. समितीने यासंबंधी आठ शिफारशी केल्या असून यावर सरकार काय निर्णय घेते याकडे खासदारांचेही लक्ष लागून आहे. खासदारांच्या मते लोकांसाठी रोज किमान १ हजार रुपये खर्च करावा लागत असल्याने वेतनवाढ व्हायलाच हवी. विविध ठिकाणचे लोक लोकप्रतिनिधी म्हणून भेटावयास येतात. त्यांच्या चहापानाचा खर्च अवाढव्य असल्याचे या खासदारांचे म्हणणे आहे.