आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliamentary Panel Says Hyper Sensitive Airports Lack Counter Terror Plans

#terrorism: देशातील विमानतळांची सुरक्षा रामभरोसे, संसदीय समितीचा ठपका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील विमानतळे किती सुरक्षीत आहेत, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. देशाच्या गुप्तचर संस्थेकडे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 20 विमानतळावंर दहशतवाद विरोधी आपातकालिन व्यवस्थाच नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. संसदीय समितीच्या एका अहवालातून हा खुलासा झाला आहे. या रिपोर्टनुसार आठ विमानतळांवर सीआयएसएफ संरक्षण देखील नाही. समितीने लवकरात लवकर एव्हिएशन सेक्युरिटी पॉलिसी तयार करण्याची शिफारस केली आहे.

कोणाकडे आहे या विमानतळांची सुरक्षा
- समितीने प्रश्न उपस्थित केला आहे, 'आता प्रश्न निर्माण होतो की या विमानतळांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाकडे आहे ? आणि ते किती सुरक्षीत आहेत?'
- विमानतळाच्या सुरक्षेकडे पाहिजे तेवढे गांभीर्याने पाहिलेले नसल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
- विमानतळाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विमानतळावर सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांना सुरक्षीत स्थळी हलवण्याची यंत्रणा देखील उपलब्ध नाही.
- दहशतवादी हल्ला झाल्यानंतरची आपातकालिन व्यवस्था फक्त दिल्ली आणि मुंबईच्या विमानतळांशिवाय कुठेही नाही.
- अशी व्यवस्था आणखी 20 इंटरनॅशनल आणि संवेदनशील विमानतळांवर करण्याची गरज आहे.
कोणत्या समितीनी तयार केला अहवाल
- तृणमूल खासदार के.डी.सिंह यांच्या नेतृत्वातील संसदेच्या स्थायी समितीने हा अहवाल तयार केला आहे. तो हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करण्यात आला होता.
- वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती यासाठी स्थापन केलेल्या या समितीने हा ताजा अहवाल तयार केला आहे.

देशात किती आहेत विमानतळ
- देशात 98 विमानतळे आहेत.
- यातील 26 अतिसंवेदनशील आणि 56 संवेदनशील श्रेणीतील आहेत.
- अतिसंवेदनशील पैकी फक्त 18 आणि संवेदनशील पैकी 37 विमानतळांवर सीआयएसएफ सुरक्षा आहे.