आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकांमध्ये जा, अन्यथा भवितव्य कठीण : पंतप्रधान नरेंद्र माेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जनतेच्या हिताच्या अनेक याेजना गेल्या दाेन वर्षांत अापण अाणल्या, त्या किती लाेकांपर्यंत पाेहोचल्या, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र माेदींनी करताच भाजपच्या बहुतांश खासदारांच्या माना खाली गेल्या. हे असेच सुरू राहिल्यास अापले भविष्य धाेक्यात अाहे हे लक्षात ठेवा, असे माेदींनी खडसावले.

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी येथे पार पडली. त्यात पंतप्रधान माेदींनी खासदारांची चांगलीच कानउघाडणी केली. जनधन याेजना, मुद्रा लाेन, अनुदानित गॅस सिलिंडर, विमा याेजना, अटल पेन्शन योजना, मेक इन इंडिया अादींबाबत तुम्ही तुमच्या मतदारसंघात जाऊन लाेकांना याबाबत माहिती दिली का? किती लाेकांना माेफत गॅस कनेक्शन मिळाले याची माहिती घेतली का? मतदारसंघातील ज्यांनी गॅस अनुदान नाकारले अाहे त्यांना भेटून त्यांचे काैतुक केलेत का? तुम्ही तुमच्या मतदारसंघात ऊर्जा उत्सव साजरा केला का? अशी प्रश्नांची सरबत्ती माेदींनी केली. त्यावर एकही खासदार उत्तर देऊ शकला नाही. एवढ्या तळमळीने अापण जनहिताच्या याेजना जाहीर करताे; परंतु त्या राबवल्या जातात की नाही याकडे तुमचे दुर्लक्ष हाेत असेल तर अापले भवितव्य धाेक्यात राहणार अाहे, असे सांगत अाता तरी कामाला लागा, असा सल्लाच मोदींनी सहकाऱ्यांना दिला. बैठकीनंतर एक खासदार म्हणाले, माेदींनी अधिकाऱ्यांना हेच प्रश्न करायला पाहिजेत अाणि त्यांच्यावर सक्ती करायला हवी. अधिकारी राजकारण करतात हे पंतप्रधानांना माहिती नाही का, असा प्रश्नही या खासदारांच्या खासगी चर्चेत उपस्थित झाला.

या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, शहरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू, ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मंत्री, नेते उपस्थित होते.

खासदारांनी फोडले अधिकाऱ्यांवर खापर
माेदींचा नाराजीचा सूर पाहता भाजपच्या खासदारांनी बैठकीनंतर कानगोष्टी सुरू केल्या. त्यात जय विदर्भ म्हणणारे महाराष्ट्रातील खासदार म्हणाले, या याेजना राबवण्याचे काम प्रशासनाचे अाहे. अाता याच गाेष्टी करत बसायच्या का? अधिकारी खासदारांशी चांगले वागतात कुठे? अधिकारी एेकत नाहीत म्हणून मुख्यमंत्री अाेरडतात. अाम्हाला कधी याेजना अाली, कधी गेली याचा पत्ताही लागत नाही.
पुढील स्लाइडमध्ये,
>> जाणून घ्या, कसे निर्धारित होते खासदारांचे वेतन
>> कोणत्या देशात किती मिळते वेतन
बातम्या आणखी आहेत...