आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. राजकीयविषयक केंद्रीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे. आयपीएल गैरव्यवहारातील फरार आरोपी ललित मोदी यांना सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांनी मदत केल्याच्या प्रकरणावरून या अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांची आक्रमकता पाहता अधिवेशनात कामकाज होईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. स्वराज व राजे यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी जोरदार मागणी केली आहे. हीच मागणी अधिवेशनातही लावून धरली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय भूसंपादन विधेयकावर केंद्र विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे विरोधक अधिक आक्रमक होतील.
बातम्या आणखी आहेत...