आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन: पहिल्या दिवशी एकत्र दिसले मुलायम-आदित्यनाथ, मोदी भेटले विरोधकांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून सूरु झाले. पहिल्या दिवशी संसदेत येणाऱ्या नेत्यांची बॉडी लँग्वेज काही वेगळीच होती. असहिष्णुता आणि जीएसटीवरुन वातावरण तापलले असताना संसदेबाहेर समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि भाजपचे फायरब्रँड खासदार योगी आदित्यनाथ समोरासमोर आल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेतली. दुसरीकडे, कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विरोधीपक्षाच्या बाकाकडे गेले. त्यांनी विरोधी नेत्यांशी हस्तांदोलन केले.
सभागृहात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे हे नेते वैयक्तिक आयुष्यात मात्र एकमेकांविषयी कोणतीही पूर्वग्रह न बाळगता भेटत असल्याचे चित्र दिसले. लोकसभेत संविधानावरील चर्चेचा एक भाग पूर्ण झाल्यानंतर मुलायमसिंह संसद भवनाच्या मुख्य द्वारातून बाहेर निघाले. तिथेच त्यांची योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भेट झाली. दोघांनी हातात हात घेत बातचित केली. आदित्यनाथ यांनी मीडियाकडे इशारा करत मुलायमसिंहाच्या कानात काही सांगितले देखील. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशात हे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. असहिष्णुतेच्या मुद्यावर दोघांनी अनेक वक्तव्ये केली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अधिवेशनाच्या पहिला दिवशी कशी होती नेत्यांची बॉडी लँग्वेज