आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरपासून, गेल्या वेळी 16% होती लोकसभेची प्रोडक्टीव्हिटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन 14 दिवसांचे असणार आहे. (फाइल) - Divya Marathi
यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन 14 दिवसांचे असणार आहे. (फाइल)

नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत म्हणजे 14 दिवस चालणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, सरकार गुजरात निवडणुकीमुळे हिवाळी अधिवेशन बोलावण्यास उशीर करत आहे. त्यावर उत्तर देताना अरुण जेटली यांनी म्हटले होते की, हे काही पहिल्यांदाच होत नाही. काँग्रेसनेही यापूर्वी असे केले आहे. यावेळीही विरोधक सरकारला नोटबंदी, राफेल डीलमधील गैरव्यवहार, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. 2016 च्या सत्राच झालेल्या गोंधळामुळे अत्यंत कमी काम झाले होते. त्यावेळी लोकसभेची प्रोडक्टीव्हिटी केवळ 16 टक्के होती. 


- संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार म्हणाले की, 25 - 26 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी राहिल. हिवाळी अधिवेशन 14 दिवसांचे असेल. हा निर्णय संसदीय कामकाजासंबंधीच्या मंत्रिममंडळ बैठकीत घेण्यात आला. 
- गुलाम नबी आजाद 21 नोव्हेंबरला म्हणाले होते की, सरकारला संसदेचे अधिवेशन बोलावण्याची इच्छा नाही. त्याचे कारण म्हणजे, संसदेत उत्तर द्यावे लागेल अशी भिती त्यांना आहे. जर या मुद्द्यावर वाद झाला तर गुजरात इलेक्शनपूर्वी सरकारचा पर्दाफाश होईल. 


गेल्या हिवाळी अधिवेशनात 22 दिवसांत फक्त 17% काम 
- गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशनात 16 नोव्हेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत विरोधकांनी केलेला विरोध आणि गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नव्हते. 
- पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या माहितीनुसार या सत्रात लोकसभेत 16% तर राज्यसभेत 18% च प्रोडक्टीव्हिटी राहिली. म्हणजे सरासरी 17% कामकाज झाले. 
- या सत्रात अनेक महत्त्वाची विधेयके सादर होणार होती, पण गोंधळामुळे ते शक्य होऊ शकले नाही. फक्त दोन विधेयके मंजूर होऊ शकली. 

बातम्या आणखी आहेत...