आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसद सव्वाशे कोटी जनतेच्या आकांक्षांचे दर्पण : उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकशाही देशाची संसद सव्वाशे कोटी जनतेच्या आशा, आकांक्षांचे दर्पण आहे. लोकशाहीचे स्वरूप आपल्या संविधानात स्पष्ट करण्यात आले आहे. हीच बाब आपल्या लोकशाहीला जिवंतपणा देणारी आहे, असे उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनी म्हटले आहे. बुधवारी विज्ञान भवन येथे लोकमत संसदीय पुरस्कार २०१७ समारंभात ते बोलत होते.  

संसदेच्या दोन्ही सभागृहांत संसदीय परंपरांचे आचरण व योगदानावर आधारित ८ खासदारांना याप्रसंगी गौरवण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लोकसभेत तर शरद यादव यांना राज्यसभेतील आचरण व मुद्द्यांना अतिशय संवेदनशील मांडल्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केरळमधून खासदार एन.के. प्रेमचंद्रन व राज्यसभेतून सीताराम येचुरी यांना उत्कृष्ट संसद सदस्य म्हणून गौरवण्यात आले. उत्कृष्ट महिला संसद सदस्य म्हणून सुष्मिता देव आणि राज्यसभेतून उत्कृष्ट महिला संसद सदस्य म्हणून मीनाक्षी लेखी, नवोदितांमध्ये रजनी पाटील यांना सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे अन्सारी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी  डॉ. मनमोहन सिंग, उमेदवार एम. व्यंकय्या नायडू, काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खरगे, खा. मुरली मनोहर जोशी, लोकमत संसदीय पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष शिवराज पाटील, लोकमत समूहाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...