आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत फोटो काढल्याने जया बच्चन संतापल्या; काँग्रेस खासदाराची माफी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभेत बुधवारी काँग्रेसचे खासदार प्रदीपकुमार बालमुचू हे सपाच्या खासदार जया बच्चन यांचा फोटो मोबाइलमध्ये काढत होते. हा प्रकार पाहताच जया यांनी हरकत घेतली. याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम त्यांनी बालमुचू यांना भरला. त्यानंतर काँग्रेस खासदाराने जया यांची माफी मागितली आणि मोबाइलमधील फोटोही डिलीट करून टाकला.

सपा, द्रमुक व अण्णाद्रमुकचे सदस्य वेगवेगळय़ा मुद्दय़ांवरून गदारोळ करत होते. त्यामुळे कामकाज तहकूब झाले होते. त्याच वेळी बालमुचू फोटो काढत होते, असे जया यांनी सहकार्‍यांना सांगितले. जया यांनी आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस खासदार अंबिका सोनी यांनी बालमुचू यांना या प्रकाराबद्दल माफी मागण्यास सांगितले. ते माफी मागण्यासाठी गेले, परंतु जया यांनी मान्य केले नाही. त्यानंतर बालमुचू आपल्या जागेवर गेले. दुसर्‍या एका खासदाराच्या मदतीने त्यांनी फोटो डिलीट करून टाकला.