आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रिकरांनी आमिरला सुनावले: विरोधकांचा आरोप संरक्षण मंत्री असुरक्षा पसरवतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - असहिष्‍णूतेच्‍या मुद्द्यावर आमिर खानने मागच्‍या वर्षी वादग्रस्‍त विधान केले होते. हा मुद्दा पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका दिवसाआधी आमिरच्‍या विधानाला ऐरोगेंट म्‍हटले होते. सोमवारी संसदेत विरोधी पक्षाने यावर उत्‍तर मागितले. दरम्‍यान राज्यसभेत माकपा नेते सीताराम येचुरी म्‍हणाले, ''सुरक्षामंत्री 'अरक्षा' (असुरक्षा) पसरवू शकत नाहीत.'' पर्रिकर आमिरबाबत काय म्‍हणाले..
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मी कोणाचे नाव घेतले नसल्याचे म्हटले आहे.
- प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने केलेले देशविरोधी विधान लोकांना पटले नाही, असे ते म्‍हणाले.
- लोकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देऊन या अभिनेत्‍याचा विरोध केला.
- काही लोकांनी तर अभिनेत्याची जाहिरात असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला.
- त्यामुळे देशाविरुद्ध बोलणाऱ्यांना नागरिकच धडा शिकवतील, असे चित्र दिसत आहे,
- पर्रीकर यांच्‍या या वक्तव्‍यावर काँग्रेसने टीका केली आहे.
- राहुल गांधी यांनी संघ आणि पर्रीकर यांना धडा शिकवायचा पाहिजे, असे ते म्‍हणाले.
- यावर स्पष्टीकरण देताना पर्रीकर म्हणाले, की मी कोणाचेही नाव घेतले नव्हते.
- मी म्हणालो होतो की जे लोक देशाचा सन्मान करत नाहीत, त्यांना विरोध केलाच पाहिजे.
काय म्‍हणाला होता आमिर..
देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत काही दिवसांपूर्वी अनेकांनी पुरस्कार सरकार दरबारी जमा केले होते. यामध्‍ये साहित्यिक, कलाकार, संशोधक, लेखक यांचा समावेश होता. त्‍यानंतर अभिनेता आमिर खानचीही त्‍यामध्‍ये भर पडली होती. काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या पत्नीने भारतात वाढत्या असहिष्णुतेबद्दल देश सोडून जाणार असल्याचे आमिरने एका कार्यक्रमात म्हटले होते. यानंतर मोठे वादंग निर्माण झाले होते. नंतर आमिर खान व त्याच्या पत्नीवर जोरदार टीकाही करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...