आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parrikar On Pakistani Boat Evidence Shows Suspected Terror Link

मच्छिमार होते तर बोट स्फोटाने का उडवली, संरक्षणमंत्री पर्रीकरांचा विरोधकांना सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पोरबंदर येथील पाकिस्तानी बोटीवर झालेल्या स्फोटावरुन देशात राजकारण सुरु झाले आहे. त्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही संदिग्ध दहशतवादी कारवाई होती असे म्हटले आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पर्रीकरांनी उत्तर दिले आहे, ते म्हणाले, जर बोटीवर मच्छिमार होत तर त्यांनी स्फोटाने बोट का उडवून दिली. येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिफेंस इस्टेटच्या भूमीपुजनासाठी पर्रीकर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पर्रीकर म्हणाले, बोटीवर जर तस्कर असतील, तर त्यांनी बोट स्फोटाने का उडवून दिली. तस्कर आत्महत्या का करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तस्कर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात कसे, असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला. पर्रीकर म्हणाले, ज्या समुद्री मार्गाने बोट आली होती, त्या मार्गाचा वापर मच्छीमार करत नाहीत.
चर्चांवर बोलणे टाळले
संरक्षणमंत्री पर्रीकरांनी स्पष्ट केले, की हे तस्करीचे प्रकरण वाटत नाही, ही संदिग्ध दहशतवादी कारवाईच होती. या प्रकरणावरुन सुरु असलेल्या तर्क-वितर्कांवर बोलण्याचे त्यांनी टाळले. ते म्हणाले, बोट ज्या मार्गाने आली होती, तो सर्वसामान्य समुद्री मार्ग नव्हता. ते तस्कर सर्वसामान्यपणे नियमीत आणि व्यस्त मार्गानेच ये-जा करतात, असेही त्यांनी सांगितले. तटरक्षक दलाच्या कामगिरीची पाठराखण करताना पर्रीकर म्हणाले, भारती कोस्ट गार्डने गुप्तचर संस्थांच्या माहितीनंतरच योग्य कारवाई केली. आमच्या संस्था 12 तास त्या बोटीवर नजर ठेवून होत्या.