आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रिकर म्हणाले- RSS संस्कारांमुळे सर्जिकल स्ट्राइक यशस्वी; जाकीर मूसा हिज्बुलचा नवा कमांडर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानच्या भूमिवर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. त्यानंतर त्यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणीमुळे लष्करी मोहिम यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार वाद अफाळून येण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्तानने भारतीय जवानांना टिपण्यासाठी सिमेवर 12 ठिकाणी स्नायपर कमांडो तैनात केले आहेत. भारतीय जवान सुदीप याला लागलेली गोळी या कमांडोंनीच फायर केली होती. दरम्यान, हिज्बुल मुजाहिदीनने जम्मू आणि काश्मिरमध्ये जाकीर मुसा याच्या नावाची नवीन कमांडर म्हणून घोषणा केली आहे.
संरक्षण मंत्रालय आणि निरमा विद्यापिठाच्या संयुक्त कार्यक्रमात पर्रिकर म्हणाले, की सर्जिकल स्ट्राइकला यश मिळण्यामागे संघाची शिकवण आहे. त्यामुळेच ही मोहिम फत्ते होऊ शकली. नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्या जन्मभूमितले आहेत. मी गोव्याचा असल्याने माझ्यावर संघाचा पगडा आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकचे योग्य प्लॅनिंग करता आले. त्यांची अंमलबजावणी शंभर टक्के करता आली. आम्हाला अहमदाबादमध्ये कुणीही विचारले नाही, की सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाले की नाही...
मनोहर पर्रिकर यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे. कॉंग्रेस प्रवक्ता संजय झा म्हणाले, की आम्ही आधीपासून म्हणत आलोय की मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय संघाकडून घेतले जातात. आज संरक्षण मंत्र्यांनी सार्वजनिकपणे सांगितले, की भारत सरकार चालवण्यामागे संघाचा हात आहे. मोदी केवळ कठपुतली आहेत.
संघाचे विचारक राकेश सिन्हा यांनी सांगितले, की संघाच्या विचारधारेने संघ स्वयंसेवक प्रभावित होतात. त्याचा हा परिपाक आहे.
मोदी गुजरात-काश्मीरचे कसाई - बिलावल
नरेंद्र मोदी गुजरात व काश्मीरचे कसाई असल्याची मुक्ताफळे पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी रविवारी येथे एका सभेत उधळली.
पुढील स्लाईडवर वाचा.... पाकिस्तानने सिमेवर तैनात केले स्नायपर कमांडो... भारतीय जवान सुदीपचा मृत्यू स्नायपर कमांडोंच्या गोळीबारात.... जाकीर मुसा झाला हिज्बुल चिफ....
बातम्या आणखी आहेत...