आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान बॉर्डरवर केमिकल शस्त्राचा वापर करतोय पाकिस्तान- संरक्षणमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अफगाणिस्थानच्या सीमेवर पाकिस्तान केमिकल शस्त्राचा करत असल्याची धक्कादायक माहिती देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आपण केमिकल आक्रमणाचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज राहायला हवे, असा इशाराही पर्रीकर यांनी दिला आहे.

पर्रिकरांनी मीडिया रिपोर्ट्स हवाला देताना सांगितले की, अफगाणिस्थानात पाकिस्तान केमिकल शस्त्राचा वापर करत आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे. शहबाज कलंदर दर्ग्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने या मोहिमेंतर्गत शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

काय म्हणाले संरक्षण मंत्री...?
- दिल्ली येथे डीआरडीओ कार्यक्रमात गुरूवारी बोलतांना मनोहर पर्रिकर म्हणाले की, 
अफगाणिस्थान आणि नॉर्दन पार्ट्समधून याबाबत धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. तेथील फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या भागातील लोक केमिकल शस्त्राचे शिकार झाल्याचे दिसत आहे. 
- भविष्यात देशावर न्युक्लियर, केमिकल किंवा बायोलॉजिकल हल्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आपण सतर्क राहायला हवे.  
- लष्कर भर्तीचे पेपर फुटीवर बोलतांना पर्रिकर म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, मंत्रालयाने एसआयटी चौकशीची शिफारस केली आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा केमिकल हल्ल्याबाबद काय म्हणाले संरक्षण मंत्री...?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...