आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेवरील 9/11 च्‍या हल्‍ल्‍यासाठी भारतातून आर्थिक मदत, X- CP चा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेत 9/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झालेत. या हल्‍ल्‍याच्‍या आठवणीने आजही अंगाचा थरकाप उडतो. या हल्‍ल्‍यासाठी भारतातील काही दहशतवाद्यांनी अर्थसहाय्य केले होते, असा गौप्‍यस्‍फोट दिल्‍लीचे माजी पोलिस आयुक्‍त नीरज कुमार यांनी त्‍यांच्‍या ‘डायल डी फॉर डॉन’ या पुस्‍तकातून केला. शनिवारी या पुस्‍तकाचे प्रकाशन होणार आहे. नीरज यांनी सीबीआयमध्‍येही काम केलेले आहे. चौकशीदरम्‍यान हा प्रकार कळला. नंतर भारताने या बाबत अमेरिकेला माहिती दिली, असेही नीरज यांनी आपल्‍या पुस्‍तकात म्‍हटले आहे.
नीरजकुमार यांनी नेमके काय सांगितले ?
> नीजरकुमार यांनी पुस्‍तकात लिहिले, दहशतवाद्यांनी 1999 मध्‍ये इंडियन एयरलाइन्सच्‍या एका विमानाचे अपहरण करून ते कंधारला नेले. या विमानातील प्रवाशांना वाचवण्‍यासाठी भारताने काही दहशतवाद्यांना सोडले होते. यात उमर शेख हा दहशतवादीसुद्धा होता. तो 9/11 चा मास्टर माइंड मोहम्मद अत्ताचा अत्‍यंत निकटर्तीय होता. त्‍याला या हल्‍ल्‍यासाठी उमरने पैसे दिले होते. उमर याला अन्‍य दहशतवादी मित्र आफताब अंसारी याने हे पैसे होते. आफताबने कोलकातामध्‍ये अमेरिकी सेंटरवर हल्‍ला केला होता.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पोलिसांना कशी मिळाली माहिती....