आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parties Assert Right To Announce Freebies In Election Manifestos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खिरापतींवर निर्बंधाला राजकीय पक्षांचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणूक जाहिरनाम्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी देऊ केलेल्या ‘मोफत’ अमिषांवर निर्बंध लादण्यास बसप वगळता विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. मोफत योजना जाहीर करणे आमचा विशेषाधिकार असल्याचे या पक्षांचे म्हणणे आहे.

जाहीरनाम्यात मोफत योजनांबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची बैठक बोलावली होती. पाच राष्ट्रीय व 23 प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींनी सोमवारच्या बैठकीत हजेरी लावली. बसप वगळता सर्व पक्षांनी मोफत योजना जाहीर करणे हा विशेषाधिकार असल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणा जाहीर झाल्यामुळे विरोधकांची रणनीती बिघडते, असे बसपचे म्हणणे होते. नागालँड पीपल्स फ्रंट आणि मिझो नॅशनल फं्रट या दोन प्रादेशिक पक्षांनी जाहीरनाम्यात मोफत योजनांच्या खिरापतीला अटकाव घालण्यास संमती दर्शवली.

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निवडणूक आयोगाला मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही बैठक बोलावण्यात आली होती. जाहीरनामा हा राजकीय पक्षांचा हक्क आहे, या शब्दांत काँग्रेस, भाजप व डाव्या पक्षांनी एकवाक्यता दर्शवली. विविध देशांचे या मुद्द्यावर धोरण ठरलेले आहे, असा युक्तीवादही त्यांनी केला.