आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parties Should Refrain From Taking Political Mileage From Communal Violence Says Prime Minister Manmohan Singh.

राज्‍य सरकारांनी सोशल मीडियाचा गैरवापर रोखावाः पंतप्रधानांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर येथील जातीय दंगल चिंताजनक असून राजकीय पक्षांनी अशा प्रकारच्‍या घटनांचे राजकारण करुन फायदा उचलण्‍याचा प्रयत्‍न करु नये, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्‍पष्‍ट केले. राष्‍ट्रीय एकता परिषदेच्‍या बैठकीचे आज (सोमवार) मनमोहनसिंग यांनी उद्घाटन केले. त्‍यावेळी ते बोलत होते. राष्‍ट्रविरोधी शक्ती कधी-कधी यशस्‍वी होतात, असेही पंतप्रधान म्‍हणाले.

पंतप्रधानांनी सोशल माध्‍यमांच्‍या गैरवापरावर चिंता व्‍यक्त केली. ते म्‍हणाले, सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका बनावट व्हिडिओमुळे मुझफ्फरनगरची दंगल भडकल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी आसाममध्‍येही सोशल मीडियाचा गैरवापर करुन हिंसाचार घडवला गेला आहे. हे रोखण्‍यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याचे मार्ग शोधा, असे पंतप्रधान म्‍हणाले. जातीय हिंसाचार रोखणे ही राज्यांची जबाबदारी आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.


राष्‍ट्रीय एकता परिषदेमध्‍ये जातीय हिंसाचार कसा रोखता येईल, यावर चर्चा होणार आहे. त्‍यासाठी विविध उपाययोजना, समाजातील विविध घटकांची मदत घेणे, महिलांची सुरक्षा इत्‍यादी मुद्यांचा त्‍यात प्रामुख्‍याने समावेश राहणार आहे. ही बैठक दोन वर्षांनी होत आहे. यापूर्वी 10 सप्‍टेंबर 2011 ला बैठक झाली होती. राष्‍ट्रीय एकता परिषदेची स्‍थापना माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी 1960 च्‍या दशकात स्‍थापना केली होती.

देशात दररोज सरासरी एक दंगल घडत असताना राष्‍ट्रीय एकता परिषदेची बैठक मात्र तीन वर्षांतून एकदा घेण्यात येत आहे. 1962 पासून आतापर्यंत परिषदेच्या फक्त 15 बैठका झाल्या आहेत.

महाराष्‍ट्रात सर्वाधिक दंगली.... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...