आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passenger Vehicle Sales In India Registered 7.87% Growth

पाच वर्षांत कार विक्रीत ७.८७ टक्क्यांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - २०१५-१६ मध्ये कार विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या दरम्यान कार विक्री ७.८७ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्यांची संस्था असलेल्या सियामच्या वतीने शुक्रवारी वार्षिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी २०,२५,४७९ कारची विक्री झाली, त्या तुलनेने २०१४-१५ मध्ये १८,७७,७०६ कारची विक्री झाली होती.

कार विक्रीमधील हा विकास दर गेल्या पाच वर्षांतील सर्वाेत्कृष्ट दर असल्याचे सियामचे उप-महासंचालक सुगतो सेन यांनी सांगितले. यामुळेच सर्वच कंपन्यांनी मोठ्या संख्येत नवीन माॅडेल सादर केले असल्याचे ते म्हणाले. विक्रीत वाढ करण्यासाठी कंपन्या मोठी सूटदेखील देत आहेत. या आधी २०१०-११ मध्ये कार विक्रीत २९.०८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.
गेल्या वर्षी ऑटो क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. व्याजदर जास्त होते, डिझेल गाड्यांच्या बाबतही स्थिती स्पष्ट नव्हती. त्या व्यतिरिक्त उत्पादन क्षेत्रात सर्वात जास्त कर ऑटोवरच लावला जातो. एकूण क्षमतेपैकी फक्त ६० टक्के क्षमतेचा वापर होत असल्यामुळे आधीच अनेक कंपन्या घाट्यात असल्याचे सेन म्हणाले.

विकासदर : २०१६-१७साठी ते टक्के विकास दर राहण्याचा अंदाज सियामच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सिमाने दोन महिन्यात दुसऱ्यांदा विकास दराचा अंदाज कमी केला आहे. अर्थसंकल्पात एकवरून चार टक्के इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावल्यानंतर मार्चमध्ये ११ ते १२ टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर दुसऱ्यांदा डिझेल वाहनामधील अनिश्चितता कायम असल्याचे कारण सांगत अंदाज कमी केला होता.

व्याजदर कपात आवश्यक
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली असली तरी बँकांनी अद्याप त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना दिलेला नसल्याचे मत सेन यांनी व्यक्त केले. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कार विक्रीत वाढ होण्याची शक्यतादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.