नवी दिल्ली - नववर्षात प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. फेब्रुवारीत सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात वाढत्या इंधन-ऊर्जा खर्चाचा बोजा भाडेवाढीच्या रूपात प्रवाशांवर टाकला जाऊ शकतो.
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने याबाबत सांगितले की, इंधन समायोजनाशी संबंधित रेल्वेभाड्याचा आढावा डिसेंबरमध्ये घेतला जाणार आहे. ती रेल्वे बजेटपासून लागू होऊ शकते. गेल्या काही महिन्यांत ऊर्जेवरील खर्च चार टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे.
रेल्वेच्या धोरणानुसार, इंधन व ऊर्जा खर्चासोबत सांगड घालण्यात आलेल्या प्रवास व मालवाहतूक भाड्याचा वर्षातून दोन वेळा आढावा घेतला जाईल. त्यानुसार जूनमध्ये प्रवासभाडे ४.२ टक्के तर मालभाडे १.४ टक्क्यांनी वाढवले होते.