आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paswan Seeks Ban On Onion Exports Before Allowing Imports

केंद्र सरकारची कबुली, सहा महिन्यातच जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जानेवारी 2014 ते जून 2014 या काळात धान्य, डाळी, खाद्य तेल, कांदा, भाज्या या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत कबुल केले आहे.

राज्य नागरिक पुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गहू, उडद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, सनफ्लावर तेल, वनस्पती तूप, बटाटे इत्यादी खाद्य वस्तूंचे मूल्य वाढले असले तरी तांदूळ, चना डाळ, शेंगदाण्याचे तेल, सरसोचे तेल, सोयाबीन तेल इत्यादी वस्तुंचे किरकोळ बाजारातील मूल्य घटले असल्याकडे पासवान यांनी लक्ष वेधले.

माल वाहतुकीत झालेली भाडेवाढ, कमी पावसाचा अंदाज, पुरवठ्यासंबंधीच्या अडचणी, साठेबाजी, काळाबाजार यामुळे निर्माण झालेली कृत्रिम टंचाई इत्यादी अनेक कारणांमुळे आवश्यक वस्तुंच्या किंमती वाढल्याची माहिती त्यांनी दिली. खाद्य पदार्थांचा पुरेसा पुरवठा आणि किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून बटाटे आणि कांद्याचे कमीतकमी निर्यातमूल्य निश्चित करण्यात आले आहे. ते अनुक्रमे 450 अमेरिकी डॉलर प्रती मेट्रिक टन आणि 500 अमेरिकी डॉलर प्रती मेट्रिक टन इतके आहे. फळ आणि भाज्यांना राज्यांच्या एपीएमसी अधिनियमाच्या यादीतून वगळण्यात आले असून मुक्त विक्रीची अनुमती देण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिनियम लागू नसलेल्या राज्यांमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी 5 दशलक्ष टन अतिरिक्त तांदळाचा पुरवठा करण्यास सरकारने अनुमती दिली आहे. राज्य सरकारने जमाखोरी आणि काळा बाजार करणार्‍याविरुद्ध ठोस कारवाई तसेच आवश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि 1980 या कलमांचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला असून या कलमांतर्गत 3 जुलै 2014 पासून एक वर्ष कालावधीसाठी बटाटे आणि कांदा साठ्याच्या सीमा निश्चित केल्या असल्याचेही रामविलास पासवान यांनी सांगितले.