आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patels Plan To Protest Against Pm Narendr Modi In Usa

USA मध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात 30 हजार पटेल एकत्र येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढील आठवड्यात अमेरिका दौरा आहे. त्याआधी येथील पटेल समुदायाने त्यांच्या विरोधासाठीची रणनीती ठरवली आहे. त्यानूसार अमेरिकेतील पटेल समुदाय लक्झरी बसेसमधून न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया येथे एकत्र येऊन पंतप्रधान मोदींविरोधातील रोष व्यक्त करणार आहे. या विरोध प्रदर्शनाचा सर्व खर्च पटेल समाज करणार आहे. गेल्या महिन्यात 25 तारखेला गुजरातमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या पाटीदार पटेलांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, त्यामुळे पटेल समाज नाराज आहे.
हॉटेल व्यवसायिक करणार नेतृत्व
अमेरिकेत मोदींचा विरोध करण्यासाठी सरसावलेल्या पटेल समाजाचे नेतृत्व येथील हॉटेल व्यवसायिक करणार आहेत. फिलाडेल्फिया येथील तेजस बखिया या पटेल समुदायाच्या हॉटेल व्यवसायिकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले, 'आम्हाला आशा आहे, की कॅलिफोर्नियात 20 हजार आणि न्यूयॉर्कमध्ये 10 पटेल मोदींच्याविरोधात रस्त्यावर उतरतील.'
पटेलांनी सोडली भाजपची साथ
कधीकाळी भाजपच्या मुख्य समर्थकांच्या यादीत गुजराती पटेल समाज हा प्रामुख्याने होता. यांचे विदेशातही प्राबल्य आहे त्यांच्या जोरावरच भाजपला विविध देशातून पाठिंबा मिळताना दिसत होता. आता हा समाज नाराज झाल्याने भाजपला विदेशातून मिळणारा पाठिंबा कमी झाला आहे. ओव्हरसीज फ्रेंडस ऑफ बीजेपी (OFBJP ) मधून अनेक पटेल बाहेर पडत आहेत. विदेशातून पक्षाला फंडिंग करणारे हेच लोक होते. त्यांनी OFBJP चे अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांच्यावर दबाव वाढवला आहे की त्यांनी समाजाच्या उर्वरित नेत्यांनाही काढावे.
पक्षाला चिंता नाही
चंद्रकांत पटेल म्हणाले, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मोदींच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना समजावण्याचा मी प्रयत्न करत आहे. हे विरोधी आंदोलन थांबवण्याचे माझे प्रयत्न सुरु आहेत. आंदोलन थांबवण्याच्या प्रयत्नाबद्दल पक्षाचे विदेश विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाला म्हणाले,'आम्ही आमच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्हाला सर्व समुदायांचा पाठिंबा आहे. पटेल समुदाय मोदींचा समर्थक आहे. त्यामुळे ते विरोधात जाण्याचा प्रश्नच नाही.'

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुजरात सरकारने का दिले नाही आरक्षण