आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानला 5 मिनिटांत उद्धवस्त करु शकतो भारताचा हा एअरबेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट रणवेवर उभे लढाऊ विमान - Divya Marathi
पठाणकोट रणवेवर उभे लढाऊ विमान
नवी दिल्ली - पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा हात असल्याचेही बोलले जात आहे. पाकिस्तानकडे भारताच्या या स्टेशनवर हल्ला करण्याची अनेक कारणे आहेत. विशेष म्हणजे, युद्धा दरम्यान येथून आमची वायूसेना अवघ्या काही मिनिटांमध्ये पाकिस्तानला उद्धवस्त करु शकते.

किती शक्तीशाली आहे भारताचा हा एअरबेस
- पाकिस्तानच्या सर्वाधिक जवळ असलेला हा भारताचा एअरबेस आहे. पाकिस्तानसोबत झालेल्या 1965 आणि 1971 च्या युद्धात याच स्टेशनवरुन पाकिस्तानवर निशाणा साधला गेला होता. येथून भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानला उद्धवस्त करण्यासाठी उड्डाण भरले होते.
- पठाणकोट एअरस्टेशन पाकिस्तानच्या सर्वाधिक जवळचा एअरबेस आहे. सीमेपासून अवघ्या 30 किलोमीटरवर हे स्टेशन आहे. येथे मिग-21 सह सुखोई आणि इतर लढाऊ विमाने तैनात असतात. त्याशिवाय एम.आय.-24 हेलिकॉप्टर आणि सर्व प्रकारचे एअरक्राफ्ट ठेवण्याची या बेसची क्षमता आहे. त्याशिवाय येथे क्षेपणास्त्र देखिल स्टोअर केलेले असतात.

पाकिस्तानसाठी कायम त्रासदायक राहिले पठाणकोट
- या स्टेशनवर अशी काही रडार व्यवस्था आहे ज्यामुळे पाकिस्तानवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. येथून उड्डाण केल्यानंतर लढाऊ विमानांना पाकिस्तानवर हल्ला करण्यास पाच मिनिटही पुरेसे असतात.
- 65 आणि 71 च्या युद्धात भारताकडून सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तानला या युद्धातील पराभवाचे शल्य अजून बोचते. त्यामुळेच पठाणकोट एअरबेस पाकिस्तान सरकार, आयएसआय आणि त्यांच्या दहशतवादी संघटनांच्या डोळ्यात खूपते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, निवडक फोटोज्...