आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Attack : JeM Chief Masood Azhar Not Arrested, Not Under House Arrest

पाकिस्‍तानचा खरा चेहरा उघड; अजहरला अटकही नाही की जैशवर कारवाई नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद - पठाणकोट एयरबेसवर हल्‍लाचा मुख्‍य सूत्रधार असलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला पाकिस्‍तानने अटकही केली नाही आणि नरजकैदेतही ठेवले नाही. दरम्‍यान, भारतीय गुप्‍तचर संस्‍थेच्‍या अहवालानुसार, ज्‍या तीन लोकांना पकडले त्‍यांचे जैशसोबत काहीही घेणे-देणे नाही.
काय आहे गुप्‍तचर संस्‍थेच्‍या अहवालात...
- पाकिस्‍तानने जैश ही दशहतवादी संघटना किंवा अजहर यांच्‍याविरुद्ध काहीही ठोस कारवाई केली नाही.
- जैशच्‍या ज्‍या तीन लोकांना पकडले गेले त्‍यांच्‍यावर जिहादावर व्‍याख्‍यान देण्‍याचा आरोप आहे.
- मसूद अजहरला ताब्‍यात घेतले अशा खोट्या बातम्‍या पाकिस्‍तान गुप्‍तचर संस्‍थेने पेरल्‍या. यामागे केवळ भारताचे लक्ष विचलित करण्‍याचा हेतू होता.
- पठाणकोट हल्‍ल्‍याची चौकशीसाठी संयुक्‍त समिती नेमली असून, तिचा अहवाल येईपर्यंत कोणतीच माहिती जाहीर केली जणार नाही, असे पंजाबचे (पाकिस्‍तानातील) कायदामंत्री राणा सनउल्लाह यांनी लाहौरमध्‍ये सांगितले.
यापूर्वी आली होती मसूद अजहरच्‍या अटकेची बातमी
- पाकिस्‍तानातील माध्‍यमांनी गत आठवड्यामध्‍ये जैश-ए-मोहम्मदचा म्‍होरक्‍या मसूद अजहर याला अटक केल्‍याचे वृत्‍त दिले होते.
- पाकिस्‍तानी गुप्‍तचर संस्‍थेने बुधवारी लाहौर विद्यापीठातील व्‍यवस्‍थापन शास्‍त्राचे वि़द्यार्थी उस्मान सरवर, साद मुगल आणि कासिफ या तिघांना अटक केली होती.
- जैश-ए- मोहंमद संघटनेच्या अनेक कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले.
- पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या कारवाईचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावाही घेतला.
- पाकिस्तानने भारतात झालेल्या एखाद्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
- भारताने जे पाच मोबाइल क्रमांक दिले होते ते ते याच लोकांचे असल्‍याचे सांगितले जात आहे.
- पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 11 जानेवारी रोजी इस्लामाबादच्या सेक्टर G-10/4 येथे छापा टाकला. हे घर अझहरचा मेव्हणा अश्फाक अहमदचे आहे.
- पाकिस्तानी मीडियाने दावा केला, की अझहर याच घरात लपून बसला होता. पाकिस्तानी पोलिस आणि संरक्षण यंत्रणा त्याचा पेशावर, बहावलपूर आणि लाहोर येथे शोध घेत होती, त्यामुळे तो इस्लामाबादमध्ये दडून बसला होता.
पाकिस्तानात अझहर कुठून करतो काम?
- अझहरचा अड्डा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे आहे. तिथेच जैशच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जाते.
- 2014 मध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेने अलर्ट दिला होता, की अझहर पुन्हा एकदा विमान अपहरणाचा कट रचत आहे.
- त्याचवेळी दिल्लीतील मेट्रोलाही अलर्ट देण्यात आला होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित व्‍ह‍िडिओ...