आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट एअरबेसला भेट देऊन दिल्‍लीकडे निघाले मोदी, सीमा भागाची केली पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - एअरबेस आणि सीमा भागाची पाहणी करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी येथे पोहोचले. दरम्‍यान, त्‍यांच्‍या सुरक्षेसाठी चोख सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आली होती. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्‍यास सहकार्य केल्‍याच्‍या संशयावरून वायू दलाच्‍या दोघांना ताब्‍यात घेतले आहे. मोदींनी या भेटीत सीमा भागाची पाहणी केली. एअरफोर्सच्‍या अधिका-यांसोबत जखमी जवानांचीही त्‍यांनी भेट घेतली. त्‍यानंतर ते दिल्‍लीला परतले.
चौकशी सुरू, आढळले दोन सिम...
- तपास अधिकाऱ्यांनी वायू दलाच्‍या दोन सर्व्‍ह‍िसमॅनला ताब्‍यात घेतले. त्‍यांची चौकशी सुरू आहे. - त्‍यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असून, त्‍यांच्‍याकडे दोन सिम आढळले आहेत.
- हेरगिरीच्‍या आरोपात अटकेत असलेला वायूदलाचा माजी टेक्नीशियन रंजित केके याच्‍यासोबत ते दोघे संपर्कात होते.
- रंजितला 28 डिसेंबर रोजी आयएसआयसाठी हेरगिरी केल्‍याच्‍या आरोपात अटक करण्‍यात आली होती.
- या हल्‍ल्‍यापूर्वीच सुरक्षा यंत्रणा या दोघांवर लक्ष ठेवून होती.
पुढे वाचा, नेमके कोणाला घेतले ताब्‍यात