आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमक सुरूच; नि:शस्त्र कुक जगदीशने अतिरेक्याला त्याच्याच रायफलने मारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> एनएसजी ले. कर्नलसह सात जवानांना वीरमरण
>४ अतिरेक्यांचा खात्मा, दोघांचा शोध अद्याप सुरूच


पठाणकोट/ नवी दिल्ली- पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच राहिली. येथे किती अतिरेकी दडलेले आहेत, याबाबत सांगितले जाऊ शकत नाही; पण किमान दोन जण असू शकतात, असे एअर मार्शल अनिल खोसला यांनी सांगितले. रविवारी दिवसभर शोधमोहीम सुरू होती. मात्र, सुरक्षा संस्थांनी कुणाला ठार मारल्याचा दावा केला नाही.

दुसरीकडे, या चकमकीत एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमार शहीद झाले. ठार मारण्यात आलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह हटवताना मृताखाली ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. यात निरंजन यांच्यासह जवान जखमी झाले. उपचारांदरम्यान निरंजन यांचा मृत्यू झाला. या चकचकीत सात जवान शहीद, तर २१ जखमी झाल्याचा दावा सरकारने केला. चार अतिरेक्यांना शनिवारीच ठार मारण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे सोपवण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने पठाणकोटमध्ये येऊन अतिरेक्यांकडून अपहृत झालेले असिस्टंट कमांडंट सलविंदर सिंह यांची चौकशी केली. त्यांना घेऊन ते दिल्लीला परतले.
वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर


प्रश्न : मोहीम संपली आहे, असे ट्विट गृहमंत्र्यांनी काल केले होते.
मोहीम संपल्याचे अाम्ही कधीच म्हणालो नाही. तेथे मोठे कंपाउंड आहे. तेथे कुणी लपला तरी मागमूस लागणार नाही. आमच्यासोबत एकदा असेच घडले होते. अखनूरमध्ये हल्ला झाला. एक व्यक्ती पडून होती. दुसऱ्या दिवशी तिने सर्वांसमोर स्वत:ला उडवले. - जनरल व्ही.के. सिंह (केंद्रीय मंत्री)

उत्तर : याला अति घाई असे म्हणतात...
>कारवाई पूर्ण करण्यासाठी सुरक्षा दलांना एवढा वेळ का लागत आहे?
एअरबेसच्या सुरक्षा समन्वयात मोठी कमतरता आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबादरी हवाई दलावर आहे.आता लष्कर बोलावण्यात आले आहे.त्यांना जागा समजून घेण्यासाठी वेळ लागत आहे. हवाई दलाकडे ड्रोन आणि हेलिकॉप्टर आहेत. पण त्यांना समोरासमोर युद्ध करण्याचे प्रशिक्षण नसल्याने ते काहीच करू शकत नाहीत. आपण जास्त घाई केली तर आपलेच जास्त नुकसान होईल.

>कारवाई संपल्याची माहिती मिळण्यासाठी आणखी किती वेळ लागू शकतो?
दोनते तीन दिवसही लागू शकतात. अतिरेकी किती आहेत, याची कोणालाही माहिती नाही. १८ चौरस किलाेमीटर इतका विस्तृत परिसर आहे. तोही दाट जंगल असलेला. परिसरात दोन-तीन वेळा झडती घेईपर्यंत कारवाई सुरू राहील. एअरबेसमध्ये घुसण्यासाठी कोणीतरी अतिरेक्यांना मदत केली आहे. सुरक्षा आणखी अत्याधुनिक करण्याची गरज आहे. >आपणकॉम्बॅट ऑपरेशनमध्ये एका वर्षात दोन कर्नल आणि आता एक लेफ्ट. कर्नल गमावले आहेत. आपल्या ऑपरेंटिग प्रोसिजरमध्ये काही कमतरता आहे काय?
लष्करात अधिकारी माेर्चा सांभाळतात. त्यांच्या मागे जवान असतात. मात्र, एखाद्या घटनेत वरिष्ठ अधिकारी शहीद झाला तर त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. शत्र्ू आता खांद्यावरील रँक पाहून गोळीबार करतो.

>एका वर्षात पंजाबमध्ये दुसरा मोठा हल्ला. अतिरेक्यांनी अाता काश्मीरएेवजी इतरत्र माेर्चा वळवला आहे काय?
पाकिस्तान काश्मीर मुद्दा आता जम्मू-पंजाबात आणू पाहतोय. आपल्याला वाटते की, दहशतवादाची संवेदना काश्मिरी मुस्लिमांची आहे. पण पाकची नजर भारताच्या नद्यांवर आहे. पाकचे अणुप्रकल्प नदीकिनारी आहेत. नद्यांचे नियंत्रण भारताकडे आहे. काश्मिरात आता मानवी हक्काचे खटले आणि मेणबत्त्या जाळणारे लोकच राहिले आहेत.

>हल्ल्यामुळे बीएसएफवर प्रश्नचिन्ह लागते?
निश्चितच.पंजाबमध्ये बीएसएफ आहे. सतत घुसखोरी होत आहे. गुरदासपूर आणि आता पठाणकोटमध्येही हे झाले आहे. सुरक्षा अाणखी कडक करावी लागेल.

>यात ड्रग्ज रॅकेटही सहभागी असू शकते...
पंजाबमध्येअमली पदार्थांची समस्या सीमेपलीकडून नियंत्रित होत आहे. ती दहशतवादाला मदत करणारी आहे.

>पठाणकोट एअरबेसच का निवडला?
तेसीमेपासून फक्त २५ किमीवर आहे, पोहोचणे सोपे आहे. तेथे हवाई दलाच्या १८ तुकड्या, मिग २१, मिग २९ आणि हेलिकॉप्टर तैनात आहेत. तेथून चीनपर्यंत निगराणी होते. तेथे हल्ल्यामुळे जगापर्यंत संदेश जातो.

>हल्ल्याची गुप्त सूचना मिळाली होती. तरीही आपले एवढे जवान शहीद का झाले?
पठाणकोटमध्येहल्ला होणार अशी माहिती मिळाली होती. पण कुठे होणार, टार्गेट काय असेल, हे स्पष्ट नव्हते. तेथे लष्कराचे मोठे डेपो आहेत. कुठेही हल्ला शक्य होता.
>ही मोदी- नवाझ संबंधांची प्रतिक्रिया आहे ?
बहुधानाही. कारण मोदी लाहोरला गेल्यानंतर आठव्या दिवशी हल्ला झाला. एवढा मोठा हल्ला एवढ्या कमी दिवसांत शक्यच नाही.

>आता यावर उपाय काय आहे?
चर्चेचाफायदा नाही. पाक लष्कराला हँडल करावे लागेल. दहशतवाद त्याच्या मदतीनेच सुरू आहे. मोदींनी पाकला अतिरेकी देश घोषित करण्याच्या मोहिमेवर काम करावे.

पुढील स्लाइडवर वाचा,हल्ला झाला तेव्हा मेसमध्ये नाष्टा बनवत होते कुक जगदीश
बातम्या आणखी आहेत...