आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Terrorist Attack: Salavindarasigh Narco Test Possible

पठाणकोट अतिरेकी हल्लाप्रकरणी सलविंदरसिंग यांची नार्को चाचणी शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पठाणकोट- पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्लाप्रकरणी एनआयएने पीएपीचे असिस्टंट कमांडंट सलविंदरसिंग यांना दिल्लीस बोलावले आहे. त्यांची नार्को चाचणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनआयएने चौकशीची दिशा हवाई तळामध्ये अतिरेकी कसे घुसले हे जाणून घेण्याकडे वळवली आहे. तेथील एका लाइनमनला ताब्यात घेतले आहे. लाइनमनने तळावरील कुंपणाच्या भिंतीवर लावलेला फ्लड लाइट वरच्या दिशेने वळवला होता. त्यामुळे तेथे घुसखोरी करणारे वॉच टॉवरवरून दिसू शकत नव्हते, असे एनआयएचे म्हणणे आहे. एनआयएनुसार १४ फुटांची कुंपण भिंत ओलांडून सहा अतिरेक्यांना शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांससह आत प्रवेश करणे सहजशक्य नव्हते. हवाई तळातून तसेच बाहेरूनही अतिरेक्यांना मदत मिळाली आहे. एनआयएच्या पथकाने शुक्रवारी तळाच्या मागील बाजूची तपासणी केली. तेथे फ्लड लाइट्स लावलेले असून नाल्याच्या बाजूने परिसरात प्रवेश करता येणे शक्य आहे.