आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भाच्याने केलेल्या प्रतापामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा राजीनामा घेतला असल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणतेही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच बन्सल यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याचेही रेलभवनातील सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र बन्सल यांची गच्छंती अटळ असल्याचे संकेत आज सकाळपासून मिळत आहेत.
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत सुनावल्यानंतर कायदामंत्री अश्विनीकुमार यांचे खातेबदल होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. त्यावेळी पक्षात भ्रष्टाचाराला कोणताही थारा नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. त्यानंतरच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बन्सल यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे बातम्यात म्हटले आहे. बन्सल यांना घरी जावे लागणार हे जवळपास स्पष्ट आहे. आज सकाळी ते आपल्या मंत्रिपदाच्या लाल दिव्याच्या गाडीऐवजी साध्या गाडीतून घराबाहेर पडले होते. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याचे आज सकाळीच स्पष्ट झाले आहे. बन्सल आज ब-याच दिवसानंतर रेल भवनमध्ये आले होते. तसेच ते रेल भवनमधून काहीही न बोलता थेट घरी निघून गेले. त्याआधी बोलताना त्यांनी म्हटले होते की, याबाबतची चौकशी प्रक्रिया सुरु आहे. याबाबत मी माझी भूमिका पहिल्याच दिवशी मांडली आहे. तसेच आजही माझे तेच मत आहे. याविषयावर मी आणखी काही बोलू इच्छित नाही.
दरम्यान, आता नवे रेल्वेमंत्री म्हणून कर्नाटकातील मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रात सध्या कामगार व रोजगार मंत्री असलेले खर्गे हे कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शर्ययीत होते. मात्र, ते केंद्रात असल्याने व सोनियांनी नवनिर्वाचित आमदारांमधूनच विधिमंडळ नेत्यांची निवड होईल, असे जाहीर केल्यामुळे खर्गे यांचा पत्ता कापला गेला. त्यामुळे खर्गे यांना केंद्रात मानाचे खाते देऊन काँग्रेस त्यांचीही नाराजी दूर करू पाहत आहे.
पुढे वाचा, गांधी घराण्याशी गेली 45 वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या मल्लिकार्जुन खारगे यांच्याविषयी, क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.