आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल दिवा सोडून साध्‍या गाडीतून निघाले बन्‍सल, गच्‍छंती अटळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्रीय रेल्‍वेमंत्री पवनकुमार बन्‍सल यांना भाच्‍याचे प्रताप भोवणार आहेत. त्‍यांची गच्‍छंती अटळ असल्‍याचे संकेत मिळाले असून आज ते लाल दिव्‍याच्‍या गाडीऐवजी साध्‍या गाडीतून बाहेर पडले. त्‍यामुळे राजकीय चर्चेला उत आले आहे. याशिवाय कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने कडक शब्‍दात सुनावल्‍यानंतर कायदामंत्री अश्विनीकुमार यांचे खातेबदल होण्‍याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्‍या कोअर समितीची शनिवारी बैठक होणार आहे. त्‍यात यासंदर्भात निर्णय होणार असल्‍याची माहिती आहे.

रेल्‍वेत लाचखोरीप्रकरणात बन्‍सल मोठ्या अडचणीत येण्‍याची शक्‍यता आहे. बन्‍सल यांनी सुरुवातीला भाचा विनोद सिंगला याच्‍यासोबत कोणतेही व्‍यावसायिक सबंध नसल्‍याचा दावा केला होता. परंतु, सीबीआयच्‍या चौकशीनंतर अनेक खळबळजनक माहिती पुढे येत आहे. उच्‍चपदासाठी लाचखोरीच्‍या या प्रकरणात बन्‍सलही अडकल्‍याचा सीबीआयने दावा केला आहे. रेल्‍वे बोर्डात उच्‍चपदासाठी लाच देणारा महेशकुमार आणि पवनकुमार बन्‍सल यांच्‍यात अनेकवेळा बैठकी झाल्‍या होत्‍या. प्रत्‍येकवेळी सिंगलाही उपस्थित होता. बन्‍सल यांच्‍या दिल्‍लीतील निवासस्‍थानीच या बैठका झाल्‍या. ही माहिती बन्‍सल यांचा खासगी सचिव राहुल भंडारी यांनी सीबीआच्‍या चौकशीदरम्‍यान दिली.