आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल अॅपद्वारे भरता येणार इनकम टॅक्स, नवीन PAN कार्डसाठीची प्रतिक्षा होणार कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या अॅप द्वारे इनकम टॅक्स भरण्याची सुविधा दिली जाणार आहे. - Divya Marathi
नव्या अॅप द्वारे इनकम टॅक्स भरण्याची सुविधा दिली जाणार आहे.
नवी दिल्ली - इनकम टॅक्स डिपार्टमेंट एक असे अॅप तयार करीत आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हीला टॅक्स भरता येणार आहे. त्यासोबतच या अॅपद्वारे तुम्हाला पॅन कार्डसाठी अर्ज करता येईल आणि फार कमी कालावधीत तुमचे कार्ड तुमच्या हातात असेल. इनकम टॅक्स विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, हे अॅप अजून प्राथमिक स्टेजवर आहे. वित्त मंत्रालयाकडून त्याला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर पायलट प्रोजेक्ट सुरु होईल. 
 
इनकम टॅक्स अधिकाधिक लोकांना करप्रणालीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फार कमी लोक कर भरत असल्याचा तक्रारवजा सूर लावला होता. 
- डिपार्टमेंट अशी एक योजना तयार करीत आहे ज्यामुळे आधार कार्डबेल्ड E-KYC करता येईल. याद्वारे काही मिनिटांमध्ये लोकांना पॅनकार्ड मिळेल. 
- याचा उद्देश नागरिकांना पॅनकार्ड सहज उपलब्ध व्हावे हा आहे, त्यासोबतच अधिकाधिक नागरिकांना कर प्रणालीत आणण्याचा डिपार्टेमेंटचा उद्देश आहे. 
बातम्या आणखी आहेत...