आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी : चार महिने आधीच Paytm चे टार्गेट पूर्ण, केजरी म्हणाले- 'नोट नाही, PM बदला'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी नेते अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी मोबाइल पेमेंट कंपनी पेटीएमच्या कमाईचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करुन काही प्रश्न उपस्थित केले. त्यात त्यांनी पेटीएम आणि पीएम मोदी यांच्यात काय संबंध आहे, असाही सवाल केला. त्यासोबतच आता 'नोट नाही, पीएम बदला', असेही म्हटले आहे.
8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी 500-1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर 4.5 कोटी यूजर्सने पेटीएम सर्व्हिसचा वापर केला, त्यापैकी 50 लाख नवे यूजर्स होते. 14 नोव्हेंबरपर्यंत पेटीएमच्या माध्यमातून 2.5 कोटी ऑफलाइन व्यवहार झाला, यातून 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली. हा आकडे एवढा मोठा आहे, की यामुळे पेटीएमचे चार महिन्यांचे टार्गेट पूर्ण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...