आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PDP MLA Arranged Meeting For Government Formation

पीडीपी आमदारांची उद्या बैठक, सरकार स्थापनेबाबात स्थिती स्पष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर नवीन सरकार स्थापन करण्यावरून पीडीपी विधिमंडळ पक्षाची बैठक गुरुवारी होणार असल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या अध्यक्षा महबुबा यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत १५ जानेवारीपर्यंत आघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

पीडीपी सूत्रांनुसार, पक्षाच्या विधिमंडळ दलाची बैठक श्रीनगरमध्ये होण्याची शक्यता आहे. यामध्ये महेबुबा यांची नेतेपदी निवड होणे निश्चित आहे. भाजपने कोणत्याही प्रकारच्या अटी ठेवल्या नाहीत. सईद यांनी भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता,त्यामुळे त्यात कोणताही बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार चालवण्यासाठी जो अजेंडा आघाडीसाठी ठरवला होता,त्यावर नवीन सरकार स्थापन होईल. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांच्या घरीही सरकार स्थापनेबाबत बैठक झाली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू काश्मीरचे प्रभारी राम माधव उपस्थित होते. ८७ जागांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीचे २७, भाजपचे २५ आमदार आहेत. गेल्यावर्षी १ मार्च रोजी भाजप-पीडीपी सरकारची स्थापना झाली होती.

सत्ताकाळात आघाडीत तणाव
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली होती. केंद्रात सत्ताधारी भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स यांसारख्या प्रस्थापित पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी पीडीपीशी आघाडी केली. या आघाडीने नंतर सत्तेची समीकरणे बदलली आणि प्रथमच या राज्यात भाजप-पीडीपीचे सरकार अस्तित्वात आले. यासाठी दोन्ही पक्षांनी काही धोरणात्मक मुद्यांवरील तडजोडीही केल्या होत्या.दरम्यान, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पुढाकारामुळे ही अनपेक्षित युती जम्मू-काश्मीरध्ये अस्तित्वात आली होती. गेल्या आठवड्यात सईद यांच्या निधनानंतर आता हेच समीकरण कायम राहणार का, याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली होती.

महेबुबा मुफ्ती यांचे नेतृत्व भाजप आमदार मान्य करतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर पीडीपीच्या विधिमंडळाची होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

गुुरुवारी महेबुबा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ?
पीडीपी नेते मिर्झा महबुब बेग यांनी भाजपसोबत आघाडी सरकार सुरू राहील असे संकेत दिले. आम्ही आघाडीच्या अजेंड्यावर कायम राहू. महेबुबा वडिलांचे धोरण पुढे चालवतील. त्या उद्या कधीही मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, असे बेग म्हणाले.

सत्ताधारी अाघाडीत पीडीपी सर्वात माेठा पक्ष
८७ जागांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीचे २७, भाजपचे २५ आमदार आहेत. गेल्यावर्षी १ मार्च रोजी भाजप-पीडीपी सरकार स्थापन झाल्यानंतर नवे समीकरण उदयास आले होते.