आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peace Process With India \'suspended\', Says Pakistan Envoy Abdul Basit

पाकिस्‍तानने थांबवली भारतासोबतची शांतता चर्चा, वाचा पाकने काय म्‍हटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली/ इस्लामाबाद - भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी ‘भारताकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळेच भारत-पाक शांतता चर्चा थांबली आहे,’ असे वक्तव्य करून पुन्हा एकदा भारताला दोष दिला आहे.

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांदरम्यान झालेल्या चर्चेविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा बासित म्हणाले, पाकिस्तानला संवाद हवा आहे. कारण केवळ संवादानेच तोडगा निघू शकतो. पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी आलेल्या जेआयटीने (पाकिस्तानी संयुक्त तपास पथक) म्हटले आहे की, भारतात त्यांना सहकार्य मिळाले नाही. भारताकडून मिळालेल्या पुराव्यांवरून हा हल्ला पाकने केल्याचे सिद्ध होत नाही.
पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी एनआयए पथक पाकिस्तानात जाण्याच्या मुद्यावरही बासित यांनी घूमजाव केले. एनआयए पथक पाकिस्तानला जाण्याचा प्रश्नच नाही. कारण जेआयटी या पूर्वअटीवर भारतात आले नव्हता, असे ते म्हणाले.
NIA च्‍या मागणीला केराची टोपली ...
> पाकिस्‍तानचे उच्‍चायुक्‍त अब्‍दुल बासित म्‍हणाले, ''कुलभूषण जाधव यांच्‍या अटकेनंतर पाकिस्‍तानामध्‍ये कोण दहशतवाद पेरत आहे, याचा पुरावा मिळाला.''
> पठाणकोट हल्‍ल्‍याच्‍या तपासासाठी भारताच्‍या NIA ला पाकिस्तानात परमिशन देण्‍यात येणार नाही, असे संकेतही त्‍यांना दिले.
> त्‍यांनी म्‍हटले, दोन्‍ही देशात कुठलाही व्‍यवहार नसून तडजोड होत आहे.
> NIA ला पाकिस्तानात तपास करू देण्‍याची मागणी भारताने केली होती.
> एवढेच नाही तर दहशतवादी मसूद अजहर याच्‍या संघटनेवर जागतिक पाळीवर बंदी आणण्‍याविरोधात चीनने मत दिले. त्‍याचे त्‍यांनी कौतुकी केले.