आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीपली लाइव्ह’चा सहनिर्माता मेहमूद फारुकीला सात वर्षे कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘पीपली लाइव्ह’ या चित्रपटाचा सहनिर्माता मेहमूद फारुकी याला एका अमेरिकन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून सात वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दिल्लीच्या एका जलदगती न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा सुनावली.

ही घटना २५ मार्च २०१५ ची आहे. कोलंबिया विद्यापीठातील एक ३५ वर्षीय विद्यार्थिनी भारतात संशोधन करण्यास आली होती. आपल्या प्रबंधासाठी ती फारुकीला भेटण्यासाठी त्याच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानी गेली होती. तेथे फारुकीने तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेनंतर फारुकीने त्या विद्यार्थिनीची माफीही मागितली होती. हिंदी चित्रपट क्षेत्रात अनेक महिलांना तसेच तरुणींची फसवणूक झाल्याच्या घटना पू्र्वी घडल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...