आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिपली लाईव्हच्या को-डायरेक्टरवर अमेरिकन महिलेचा बलात्काराचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - मोहम्मद फारुकी. - Divya Marathi
फाइल फोटो - मोहम्मद फारुकी.
नवी दिल्ली - अमेरिकेच्या एका महिलेने पिपली लाईव्ह या हिंदी चित्रपटाचे सहदिग्दर्शक मोहम्मद फारुकी यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. दिल्लीच्या न्यू फ्रेंडस कॉलनी ठआण्यात या प्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी फारुकी यांना अटक करून तुरुंगात रवानगी केली.
फारुकीने 28 मार्चला रेप केल्याचा आरोप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भात 19 जूनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीत सुखदेव विहारमध्ये बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फारुकी पीपली लाइव्हच्या दिग्दर्शन अनुषा रिझवी यांचे पती आहेत.

6 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अमेिरकन महिलेने फारुकी यांच्यावर दिल्लीच्या सुखदेव विहार परिसरात बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 19 जूनला गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचदिवशी फारुकी यांना अटकही करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी त्यांना शुक्रवारीच कोर्टात हजर केलेय कोर्टाने त्यांची सहा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
बातम्या आणखी आहेत...