आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पीपली लाइव्ह\'चा सह-दिग्दर्शक फारुकीची RAPE केसमधून मुक्तता, US रिसर्चरने केला होता आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर महिलेच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी 19 जून 2015 रोजी फारुकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. - Divya Marathi
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर महिलेच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी 19 जून 2015 रोजी फारुकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
नवी दिल्ली -  'पीपली लाइव्ह'चा सह दिग्दर्शक महमूद फारुकी याची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत दिल्ली हायकोर्टाने बलात्काराची घटना आणि तक्रारीच्या सत्यतेवरुन प्रश्न उपस्थित केला. दिग्दर्शक फारुकीविरोधात अमेरिकन महिलेने (30) दोन वर्षांपूर्वी बलात्काराची तक्रार दिली होती. ट्रायलनंतर कोर्टाने फारुकीला 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला फारुकीने हायकोर्टात आव्हान दिले होते. 
 
आरोपीच्या वकीलांचा युक्तिवाद - रिलेशनशिपचा अर्थ रेप नाही 
- अमेरिकन संशोधक महिलेसोबत बलात्काराच्या आरोपात 7 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर फारुकीने निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. 1 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश आशुतोष कुमार यांनी निर्णय राखून ठेवला होता. 
- सुनावणी दरम्यान फारुकीच्या वकीलाने अमेरिकन महिलेचे आरोप फेटाळले आणि म्हटले की त्या दिवशी तसे काही झालेच नव्हते. 
- फारुकीच्या वकीलाने हायकोर्टाला महिला आणि त्यांच्या अशीलादरम्यान झालेल्या मेसेजचा हवाला देऊन सांगितले, 'दोघे जानेवारी 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपमध्ये लोक एकमेकांकडे आकर्षित होतात. असेच काही झाले होते. मात्र त्याचा अर्थ बलात्कार होत नाही.'
 
सत्र न्यायालयाने सुनावली होती 7 वर्षांची शिक्षा 
- अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर महिलेच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलिसांनी 19 जून 2015 रोजी फारुकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेचा आरोप होता की 28 मार्च रोजी आरोपीने साऊथ दिल्लीतील फ्लॅटमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. 
- त्यानंतर 30 जुलै 2016 रोजी सत्र न्यायालयाने फारुकीला दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड सुनावला होता. फारुकीने या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. 
बातम्या आणखी आहेत...