नवी दिल्ली - फकिराच्या (रामदेव) माध्यमातून वजिराला (
नरेंद्र मोदी) बदनाम करण्याचा प्रकार विरोधकांचा सुरू असल्याची प्रतिक्रिया बाबा रामदेव यांनी पुत्रजीवक औषधीवर निर्माण झालेल्या वादावर दिली आहे. या वादानंतर
आपल्या औषधीचे नाव बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जदयूचे खासदार केसी यांनी गुरुवारी राज्यसभेत हा मुद्दा उचलला होता. त्यांनी म्हटले होती की, पंतप्रधान म्हणतात बेटी बचाओ. त्यांचे मित्र म्हणतात बेटा बढाओ. हा कसला विरोधाभास आहे. याप्रकरणी बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, या औषधाविषयी खोटी माहिती देण्यात येत आहे. औषधावर कुठेली लिहिले नाही की, ते मुलगा होण्यासाठी उपयोगी आहे. त्याचे वैज्ञानिक नावही पुत्रजीवाच आहे. रामदेव यांनी स्पष्ट केले की, आज नाव बदलले तर उद्या आणखी दुसऱ्या आैषधीवर आक्षेप घेण्यात येईल. त्यामुळे, पुत्रजीवाचे नाव बदलणार नाहीच. सध्याचा साठा संपल्यानंतर येणाऱ्या नवीन मालावर या औषधीचा मुलगा किंवा मुलगी होण्याशी संबंध नाही, अशी सूचना देणार आहोत. संसदेत खोटे बोलणे गुन्हा आहे. आरोप लावणाऱ्या खासदारांना लाज वाटायला पाहिजे. त्यांना आयुर्वेदाचे ज्ञान नाही.
पत्रपरिषदेतच बाबांनी योगकला शिकवली.