आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • People Demands Action On Officers Who Destroyed Temple In Noida

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'नागपाल यांना हटविणा-यांनी आता मंदिर पाडणा-यांवरही कारवाई करावी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा- उत्तर प्रदेशमधील आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनावरून सुरु असलेले राजकारण चांगलेच पेटण्‍याची शक्‍यता आहे. नागपाल यांच्‍या निलंबानाच्‍या आठवडाभरापूर्वी ग्रेटर नोएडाच्‍या बीटा-1 सेक्‍टरमध्‍ये ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्‍या अधिका-यांनी एक मंदिर पाडले. मंदिर पाडणा-या अधिका-यांवर कारवाई करुन त्‍यांना निलंबित करावे, अशी मागणी आता करण्‍यात येत आहे. तर निलंबनाच्‍या मुद्यांवरुन राजकीय वाद भडकला आहे. नागपाल यांच्‍यावर अन्‍याय होणार नाही, अशी सूचना कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना दिल्‍यानंतर समाजवादी पार्टीने प्रत्‍युत्तर दिले आहे. राज्‍यातील सर्व आयएएस अधिका-यांना केंद्राने परत बोलवावे, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकार करेल, असे सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले.

नागपाल यांच्‍या निलंबनावरुन सपाच्‍या नेत्‍यांनी सरकारचे समर्थन केले आहे. तर आता एक मंदिर पाडल्‍यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. हे मंदिर ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्‍या परवानगीनंतर 250 वर्गफूट जागेवर बांधण्‍यात आले होते. त्‍यासाठी 42 हजार 500 रुपये प्राधिकरणाला रक्‍कम देण्‍यात आली होती. श्री राम जानकी मंदि‍र ट्रस्‍टने येथे शंकराचे मंदिर बांधले. परंतु, परवानगी दिल्‍यानंतरही प्राधिकरणाच्‍या अधिका-यांनी 19 जुलैला बांधकाम पाडले. बेकायदा उभारण्‍यात आलेल्‍या मशिदीची भिंत पाडण्‍यावरुन नागपाल यांचे निलंबन झाले. तर मग या अधिका-यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्‍यात येत आहे.