आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People From Any Religious Background Are Free To Adopt Child: SC

मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा हक्क, सुप्रीम कोर्टाचा निकाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील मुस्लिमांनाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार असल्याचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला. मात्र मुस्लिम पर्सनल लॉमध्ये दत्तक घेण्याची मुभा नसल्याचे काही मौलवींचे मत आहे. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली न्यायपीठाने 8 वर्षे जुन्या याचिकेवर हा निकाल दिला. कोर्टाने म्हटले की, ज्युव्हेनाइल जस्टिस अ‍ॅक्टनुसार देशात प्रत्येकाला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे, मग तो कोणाही जातिधर्माचा असो. मुस्लिमांनाही कायदा लागू आहे. शबनम हाशमी यांच्या याचिकेवर हा निकाल होता. संपत्तीवर हक्क नाही : मोहंमद पैगंबरांनीही मुले दत्तक घेतली होती. त्यामुळे त्यात काही गैर नाही. मात्र, पर्सनल लॉ बोर्डाच्या नियमानुसार दत्तक मुलाला वारसाहक्काने मालमत्तेत अधिकार सांगता येत नाही. पित्याने स्वखुशीने दिलेली मालमत्ताच त्याला मिळू शकते, असे इमारत-ए-शरिआचे आमिर मौलाना मोहंमद मोईजोद्दीन यांनी म्हटले आहे.