आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा : 3 दिवसांत वाढले हवाला व्यवहार, ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठी गुगल सर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 500-1000 च्या नोटा बंद करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर ब्लॅक मनी व्हाइटन करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचे समोर आले आहे. हवालाच्या व्यवहारांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचाही दावा करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे इनकम टॅक्स डिपार्टमेंटही अलर्ट झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिल्ली-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये 500-1000 च्या नोटांच्या रुपात मोठ्या प्रमाणावर रोख बाळगणाऱ्यांवर छापे टाकले. मोठ्या रोख रकमांच्या काही प्रायव्हेट डील्सही वाढल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर लोकांनी गुगलवर ब्लॅक मनी व्हाइट कसा करावा हे सर्चही केले आहे.

ज्वेलर्स, हवाला डीलर्सवर करडी नजर
- 500-1000 च्या नोटा बंद करण्याच्या घोषणेनंतर रोखीने व्यवहार करणारे ज्वेलर्स, सावकार, हवाला डीलर्स यांच्यावर कर विभागाची नजर आहे.
- लुधियाना, चंदिगड, मुंबई आणि दिल्लीत अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले.
- नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर सरकार आणि अधिकाऱ्यांची नजर मोठ्या खरेदी आणि डील्सवरही आहे.
- कार, फ्लॅट, लक्झरियस आयटम, ज्वेलरी मोठे व्यवहार यावरही नजर ठेवली जात आहे.
- ब्लॅक मनीच्या शोधासाठी प्रॉपर्टी डील्सवरही नजर ठेवली जात आहे.

गुगलची मदत..
- 500-1000 च्या नोच बंद होताच गुगलवर ब्लॅक मनी व्हाइट कसा करायचा हे सर्च केले जाऊ लागले.
- गुगलवर गुजरातच्या लोकांनी हे सर्वाधिक सर्च केले असल्याचे समोर येत आहे.
- गुगलवर ब्लॅक मनी व्हाइट करण्याचे मार्ग शोधणाऱ्या टॉप 5 राज्यांपैकी गुजरात (100%) पहिल्या क्रमांकावर आहे.
- हरियाणा (96%), पंजाब 80%, नवी दिल्ली 73% आणि महाराष्ट्र (70%) ही राज्येही यादीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...