आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People To People Contact Is Essential: Farooq Abdullah

भारताची संपूर्ण फौज आली तरी POK वर ताबा मिळवू शकत नाही -अब्दुल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी 24 तासांत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता ते म्हणाले, भारताची संपूर्ण फौज जरी आली तरी ते पाक व्याप्त काश्मिर घेऊ शकत नाही. जम्मू-काश्मिर मुद्दा सोडवण्याचा एकमेव मार्ग चर्चा असल्याचे त्यांनी जोरकसपणे सांगितले.

काय म्हणाले अब्दुल्ला
शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत फारुख अब्दुल्ला म्हणाले, 'भारताची संपूर्ण फौज जरी आली तरी पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घेऊ शकत नाही. पाकिस्तानचीही संपूर्ण फौज आली तरी ते काश्मिरला हात लावू शकत नाही. मात्र जम्मू-काश्मीरचा तिढा चर्चेने सोडवला जाऊ शकतो. हाच त्याचा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक माणसाचा संवाद झाला पाहिजे. सुचेतगडचा (भारत-पाकिस्तानला जोडणारा) मार्ग सुरु झाला पाहिजे.'

अब्दुल्लांचा पुनरुच्चार - पीओके हा पाकिस्तानचा भाग राहिला पाहिजे आणि जम्मु-काश्मिर भारताचा. मी हे प्रथमच म्हणत नाही. आज माध्यमांची ताकद वाढली आहे. तेव्हा कोणत्याही घटनेची माहिती देताना हे लक्षात असले पाहिजे की त्याचा देशावर काय परिणाम होईल ? भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश न्युक्लिअर पॉवरने सज्ज आहेत. दोन्ही देश एकमेकांचा भू-भाग हिसकाऊ शकत नाही.

शुक्रवारी काय म्हणाले होते अब्दुल्ला ?
फारुख अब्दुल्ला जम्मु-काश्मिरचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यासोबतच ते केंद्रीय मंत्री होते. शुक्रवारी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, 'पीओके आता पाकिस्तानाचा भाग राहिल आणि जम्मू-काश्मीर भारताचा. आम्ही आता हे समजून घेतले पाहिजे. युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. युद्धात आम्ही आमचे जवान गमावतो. चर्चा हेच या प्रश्नाचे उत्तर आहे.'
- काही दिवसांपासून माध्यमांमध्ये कायम चर्चा सुरु आहे की पीओकेमध्ये पाकिस्तानच्या कारवाया वाढल्या आहेत. तेथिल लोकांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.