आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरांच्या राज्यात आसाराम यांच्या समर्थनार्थ जोरदार अभियान, भाजप उपाध्यक्षही कोर्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर/जयपूर - राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेले आरोपी आसाराम यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओंकारसिंह लखावत हे आसाराम यांच्या बचावात जोधपूर कोर्टात हजर झाले. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी आसाराम यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये बंद करण्यात आले होते. आरोपीविरोधात तक्रारदारांची साक्ष बुधवारी एकाच दिवसात पूर्ण झाली. आज (गुरुवार) बचाव पक्षाची बाजू ऐकून घेण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांनी बुधवारी आसारा्म यांच्या बचावात आवाज बुलंद केला होता. जोधपूरमध्ये संत समुदाय सातत्याने आसाराम यांच्या समर्थनार्थ अभियान राबवत आहे. आज (गुरुवार) सकाळी हजारो आसाराम समर्थक रस्त्यावर आले होते.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणी सुरु केले अभियान, कोणते सेलिब्रिटी झाले सहभागी